Cholestrol Level : आपल्या शरीरात असणारं कोलेस्ट्रॉल (Cholesterol) हे मेणाप्रमाणे एक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल 2 प्रकारची असतात, एक डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि दुसरं हाई डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL). जर तुमच्या रक्तात LDL चं प्रमाण जास्त झालं तर ब्लड आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिट वाढतं, ज्याला प्लॅक म्हटलं जातं. आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं.
डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळी HDL, LDL आणि टोटल कोलेस्ट्रॉल मोजू शकतात. नॉन-एचडीएल फॅटा स्तर तुम्हाला समजू शकतो. हे घटक हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या वयानुसार शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल (Cholesterol level) किती असलं पाहिजे
मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, 19 वर्षांपर्यंतच्या तरूणांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल 170mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. याचं non-HDL 120 mg/dl पेक्षा कमी आणि LDL 100 mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर HDL 45 mg/dl पेक्षा जास्त असलं पाहिजे.
20 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांच्या शरीराचं टोटल कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl च्या मध्ये असलं पाहिजे. तर दुसरीकडे non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असायला पाहिजे. HDL लेवल 40 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक होणं गरजेचं आहे.
20 वर्षांपेक्षा जास्त वयातील महिलांच्या शरीरात टोटल कोलेस्ट्रॉल 125–200 mg/dl मध्ये असलं पाहिजे. याशिवाय non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर HDL लेवल 50 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक असलं पाहिजे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल लेवलचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. कारण कोलेस्ट्रॉल लेवल बिघडली तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची भीती असते.
द अमेरिकन अकॅडेमी ऑफ डेर्मेटोलॉजी असोसिएशननुसार, काही प्रमाणात तुमची त्वचा तुमच्या शरीरात वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे संकेत देत असते. (symptoms of high cholestrol)
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात. त्याचप्रमाणे कोपर, गुडघे, हात, पायांचे तळवे आणि इतकंच नाही तर नाकावरही आढळतात. काही वेळा पिंपल्स किंवा चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांसारखे वाटल्याने या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं. मात्र कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर या पुळ्यांचा आकार मोठा होतो. अनेकवेळा त्यांच्यामुळे कोणतीही वेदना जाणवत नाही. (this body part will give you signs if your cholestrol increses )