Tomato Side Effect : तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, अन्यथा आरोग्याची मोठी हानी

Tomatoes Side Effects: आपल्याआरोग्याठी काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. कारण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. त्यामुळे अशा गोष्टीपासून वेळीच सावध व्हा. तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? तर अधिक जाणून घ्या.

Updated: Jan 10, 2023, 04:12 PM IST
Tomato Side Effect : तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, अन्यथा आरोग्याची मोठी हानी  title=
Tomato News

Tomatoes Side Effects For Health: आपल्या जेवणात टॉमेटो असतो. (Health Care Tips) बहुतेक लोकांना टोमॅटो खायला आवडतात. परंतु जास्त खाणे हे तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहेत. (Health News) टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने काय तोटे होतात, ते जाणून घ्या.

काही फळे आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु त्यांचे जास्त सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. आपल्या जेवणात कोशिंबीर असते. यातमध्ये टॉमेटो असतो. टॉमेटो प्रमाणात खाणे चांगले असते. मात्र, काही लोक प्रमाणाबाहेर टोमॅटो खातात. टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. कारण टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारकही असतात.  

टोमॅटो खाल्ल्याने आरोग्यास काय नुकसान पोहोचू शकते?

अ‍ॅसिडिटीची समस्या -
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) चांगल्या प्रमाणात असते. म्हणूनच टोमॅटो आम्लयुक्त आहे. म्हणूनच याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटो अती खाणे शक्यतो टाळा.

गॅसची समस्या -
अनेकाना पचनाचा त्रास  असतो. त्यामुळे गॅसचा त्रास जाणवू लागतो. ज्या लोकांना गॅसची समस्या असते. त्या लोकांनी टोमॅटोचे जास्त सेवन करणे टाळले पाहिजे. कारण टोमॅटोमुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे गॅसची समस्या टाळण्यासाठी टोमॅटो वर्ज केला पाहिजे.

किडनी स्टोनची समस्या -
ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे. त्यांनी बियासहीत टॉमेटो खाणे अधिक धोक्याचे आहे. किडनी स्टोनच्या रुग्णांनी चुकूनही टोमॅटोचे सेवन करु नये. कारण टोमॅटोच्या बियांमुळे खड्यांची समस्या वाढू शकते. दुसरीकडे, तुम्ही जरी टोमॅटोचे सेवन केले तरी आधी टोमॅटोचे बिया काढा मग त्याचे सेवन करा.

छातीत जळजळ -
अनेकांना जागरण केल्याने जळजळ होण्याची समस्या असते. ज्यांना जळजळ होण्याचा त्रास असतो, अशा लोकांनी टॉमेटो खाऊ नये. जर तुम्ही टोमॅटोचे जास्त सेवन केले तर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी  (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जर तुम्ही टोमॅटोचे जास्त सेवन करत असाल तर काळजी घ्या.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)