Pregnant महिला देखील Zika Virus चा शिकार, गरोदर स्त्रीने 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

गेल्या 10 दिवसांत 5 झिका व्हायरसचे रुग्ण पुण्यात सापडले आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेला देखील झिका व्हायरसची लागण झाली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 1, 2024, 03:10 PM IST
Pregnant महिला देखील Zika Virus चा शिकार, गरोदर स्त्रीने 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका  title=

झिका व्हायरसला अजिबातच हलक्यात घेऊ नका. गर्भवती महिलांना देखील अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. याचा बाळ आणि गरोदर महिलेवर होतो परिणाम. झिका व्हायरस पुन्हा एकदा डोकं वर करु लागला आहे. गर्भवती महिलांना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. झिका व्हायरसच्या संक्रमणांची लक्षणे अगदी साथी असतात. यामुळे गरोदर महिलांनी सतर्क राहणे गरजेचे असते. कारण या झिका व्हायरसचा परिणाम गर्भावर आणि मातेवर होऊ शकतो. 

कसा पसरतो झिका व्हायरस? 

झिका व्हायरस संक्रमित मच्छर एडीज एजिप्टी आणि एल्बोपिक्टसच्या चावण्याने पसरते. हा व्हायरस यौन संपर्क, ब्लड इंफेक्शन किंवा प्रसूती दरम्यान संक्रमित आईकडून गर्भात प्लॅसेंटामार्फत पोहोचतात. यामुळे गर्भवती महिलेला पहिल्या तीन महिन्यात अल्ट्रासाऊंड स्क्रिनिंग करताना सावधान असणे गरजेचे आहे. 

झिका व्हायरसचे लक्षण

झिका विषाणूची लागण झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये कोणताही संसर्ग दिसून येत नाही. परंतु जर एखाद्याला ताप, पुरळ, सांधे आणि स्नायू दुखणे, डोकेदुखी किंवा नेत्रश्लेष्मलाशोथ वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे संक्रमित डास चावल्यानंतर एका आठवड्यानंतर दिसतात आणि त्यानंतर सुमारे एक आठवडा टिकू शकतात.

बाळावर काय होतो परिणाम

बाळाला जर मातेकडून याची लागण झाली तर मायक्रोसेफली नावाचा बर्थ डिफेक्ट होताना दिसतो. या स्थितीमध्ये मुलाचं डोकं लहान किंवा चपट असतं. यासोबतच डोळे कमकुवत होतात. सांधेदुखीची समस्या आणि मेंदूत न्यूरॉक्सची कमतरता आणि हायपरटोनियाची समस्या जाणवू लागतात. 

झिकावर काय उपाय? 

गर्भवती महिलेमध्ये झिकाचे लक्षण दिसल्यावर ब्लड किंवा युरियनचे RT-PCR टेस्ट गरणे गरजेचे असते. झिका व्हायरस करिता एंटीव्हायरस ट्रीटमेंट नाही आहे. मात्र डॉक्टर यावर नक्कीच औषधे देतात. या दिवसात गर्भवती महिलांनी आराम करावा तसेच हायड्रेट राहणे गरजेचे आहे. 

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)