अँकीलुजिंग स्पाँडिलायटिसचे व्यवस्थापन करण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

अँकीलुजिंग स्पाँडिलायटिससारख्या अवस्थेचे व्यवस्थापन करणे सध्याच्या परिस्थितीत फार कठीण 

Updated: Jun 21, 2020, 01:59 PM IST
अँकीलुजिंग स्पाँडिलायटिसचे व्यवस्थापन करण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा title=

मुंबई : सध्याच्या साथीशी लढा देण्यासाठी आपण सगळे प्रतिबंधात्मक उपायांचे एकत्रीकरण करत असतानाच, अँकीलुजिंग स्पाँडिलायटिससारख्या जुनाट विकारांसह जगणाऱ्यांना या अवस्थेचे व्यवस्थापन करणे सध्याच्या परिस्थितीत फार कठीण ठरू शकते असे क्वेस्ट मल्टिस्पेशालिटी क्लिनिकचे कन्सल्टण्ट फिजिशिअन अँड मेडिकल एज्युकेटर डॉ. सुशांत शिंदे यांनी सांगितले.

एएसची लक्षणे:

सकाळी लवकर पाठीच्या खालील भागात वेदना तसेच ताठरपणा जाणवणे व ही अवस्था ४५ मिनिटांहून अधिक काळ टिकणे

औषधे घेऊनही ९० दिवसांहून अधिक काळ पाठदुखी व पाठीचा ताठरपणा कायम राहणे

पाठ, सांधे, नितंब व मांड्यांतील वेदनांमध्ये अचानक खूप वाढ होणे.

अँकीलुजिंग स्पाँडिलायटिस (एएस) ही एक दाहकारी अवस्था असून, यामुळे प्रामुख्याने पाठीच्या कण्यात गुंतागुंत होते. यावर उपचार झाले नाहीत, तर या दाहामुळे हालचालींवर निर्बंध येतात, अखेरीस रुग्ण व्हीलचेअरपुरता मर्यादित होऊ शकतो किंवा अंथरुणालाही खिळू शकतो.   

प्रभावी मार्ग 

सामान्य लोकांप्रमाणेच एएसच्या रुग्णांनीही सोशल डिस्टन्सिंग, उत्तम वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यकारक जीवनशैली आणि शक्य असल्यास घरून काम करणे हे प्रतिबंधात्मक उपाय केलेच पाहिजेत. 

कोणत्याही भीतीला किंवा चिंतेला बळी पडून औषधे घेणे न टाळणे महत्त्वाचे आहे. एएस रुग्णांनी त्यांची नियमित औषधे सुरू ठेवावीत व व्यायामही करत राहावे. मात्र, चित्तवृत्तींमध्ये होणारे बदल किंवा अवस्थेतील लक्षणीय बदलांबद्दल तुमच्या ऱ्हुमॅटोलॉजिस्टला माहिती देत राहणे नेहमीच उत्तम ठरेल. सेकंड ओपिनियन घेणेही आवश्यक आहे. 

एएसच्या ज्या रुग्णांना पूर्वीपासून जीवशास्त्रीय उपचार दिले जात आहेत, त्यांनी ती औषधे सुरू ठेवावी. बायोलॉजिक्स अचानक बंद केल्याने अवस्थेची तीव्रता वाढू शकते. म्हणूनच अशा वेळी कायम तज्ज्ञांचे मत घेत राहावे.

लॉकडाउन किंवा अन्य कोणत्या कारणामुळे तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करू शकत नसाल, तर तुमच्या डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयाकडे टेलीमेडिसिन कन्सल्टेशनच्या पर्यायाबाबत विचारणा करा. बहुतेक डॉक्टरांनी टेलीमेडिसिन कन्सल्टेशन सुरू केले आहे. भारतात अधिकारी यंत्रणांनी टेलीमेडिसिनबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याद्वारे तुमचे डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतील. 

व्यायामाचा अभाव आणि वाढलेला ताण कोणत्याही विकाराची लक्षणे अधिक तीव्र करू शकतात. म्हणूनच दररोज व्यायामाच्या नियमात खंड पडू देऊ नका, समतोल आहार घ्या आणि ताणमुक्त जगण्याचा प्रयत्न करा. ध्यानधारणा व योगासनांच्या मदतीने या कठीण काळात ताण कमी करता येतो. 

रुग्ण सबक्युटॅन्युअस म्हणजे त्वचेखालील इंजेक्शने घेत असतील, तर ती रुग्णालयाच्या मदतीखेरीज सुरू ठेवता येतील. परिचारिका ही इंजेक्शन्स देऊ शकतात तसेच काहीवेळा स्वत: रुग्णही हे डोस स्वत:ला इंजेक्ट करून घेऊ शकतात. मात्र, रुग्ण जर इंट्राव्हेन्युअस इन्फ्युजन घेत असतील, तर त्यांनी ऱ्हुमॅटोलॉजिस्टकडूनच ते उपचार करून घेणे योग्य ठरेल.