स्थुल मांड्या त्रासदायक ठरतायत? ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स

Rujuta Diwekar Health Tips :  बैठ्या शैलीमुळे अनेकांना त्रास होताना दिसत आहे. हिप्स, मांड्या घासणे यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला खास योग. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 16, 2024, 10:03 AM IST
स्थुल मांड्या त्रासदायक ठरतायत? ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स title=

बदलती जीवनशैली आणि कामाच्या बदलत्या सवयी याचा परिणाम नागरिकांच्या थेट आरोग्यावर होत आहे. अनेकांना शारीरिक व्याधींमध्ये हिप्स बाहेर येणे, स्थुल मांड्यामुळे चालताना त्रास होणे, कंबर दुखणे यासारख्या समस्या जाणवतात. अशा त्रासावर औषधे तरी किती घेणार असा प्रश्न पडतो. या सगळ्यावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला खास योग आणि काही टिप्स 

चालताना हिप्स बाहेर असणे 

आपल्यापैकी अनेकांना ही समस्या असेल किंवा त्यांनी हे अनुभवलं असेल की, काही व्यक्ती चालताना त्यांच्या हिप्स बाहेर येतात किंवा छाती पुढे असते. ही चालण्याची शैली आरोग्यासाठी घातक ठरु शकते. अशावेळी ऋजुताने सांगितलेली टिप्स फॉलो करा. 

स्थुल मांड्या घासतात 

आपल्यापैकी अनेकांना चालताना मांड्या घासणे आणि त्यामुळे जळजळ होणे असा त्रास जाणवतो. कपडे बदलणे किंवा क्रिम लावणे हा पर्याय नाही. अशावेळी ऋजुता दिवेकरने सांगितलेला पर्याय आणि योग महत्त्वाचा ठरतो. 

अयंगर योगा-ब्लॉक 

  • अयंगर योगमध्ये तुम्ही एक ब्लॉक आपल्या मांड्यामध्ये ठरायचे आहे. यामुळे तुमच्या मांड्या मोकळ्या होतीलच सोबत कंबर, गुडघे आणि टांचावरील ताणही कमी होतो. 
  • यानंतर मांड्यांमध्ये ब्लॉक तसाच ठेवून दिवसातून पाच वेळा तुम्ही खाली बसण्याचा प्रयत्न करावा. पण ब्लॉक मांड्यामध्ये तसाच ठेवणे आवश्यक आहे. 
  • यामुळे तुमची हिप्स कमी होण्यास प्रयत्न होतात. हे करताना हात समोर ठेवावेत. हे करताना तुमचं शरीर मागच्या बाजूला न ठकलता ते पुढे ठकलावे. यामुळे खूप फायदा होईल. 

मांड्या का घासल्या जातात?

मांड्यांना खूप घाम येत असेल तर ही समस्या निर्माण होते. घाम खूप आल्यानंतर तुमच्या मांड्यामध्ये घाम साचून राहतो आणि त्याचा अधिक त्रास होतो. उन्हाळ्यात ही समस्या सर्वाधिक जाणवते. घामामध्ये असलेल्या क्षारामुळे मांड्या एकमेकांवर घासल्या जातात. आणि मांड्या लाल होतात. एवढंच नव्हे तर मांड्यांवर अतिरिक्त चरबी असल्यास तेथे स्थूलपणा जास्त जावणतो. अति स्थूल असलेल्या व्यक्तींच्या मांड्या एकमेकांना घासल्या जातात आणि तो भाग लाल होतो. बऱ्याचदा बारीक असलेल्या व्यक्तींना देखील या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी मांड्यांना तेल किंवा क्रिम लावणे यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी घरगुती उपाय म्हणजे हा योग आणि ऋजुताने दिलेल्या टिप्स नक्कीच मदत करतील. 

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)