९० टक्के प्रभावी pfizer vaccine नंतर, ९२ टक्के प्रभावी रशियन vaccine

कोरोनावर मात करण्याासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी आणखी एक

Updated: Nov 11, 2020, 10:37 PM IST
९० टक्के प्रभावी pfizer vaccine नंतर,  ९२ टक्के प्रभावी रशियन vaccine title=

मुंबई : कोरोनावर मात करण्याासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी आणखी एक रामबाण लस आल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी pfizer vaccine ने ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला होता. पण आता ‘स्पूतनिक-5’ (Sputnik V) ही लस ९२ टक्के कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे.

गमालेया आणि रशियाच्या प्रत्यक्ष गुंतवणूक(आरडीआयएफ) फंडकडून सांगण्यात आलं आहे की, ४० हजार स्वयंसेवकांनी या ट्रायलमध्ये भाग घेतला. ट्रायलमधील १६ हजारपेक्षा अधिक स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर त्याचा अभ्यास केला गेला. यात पहिले इंजक्शन दिल्यानंतर २१ दिवसांनी प्लेसिबो लस देण्यात आली.

कोरोना व्हायरसच्या २० पेशंटचं विश्लेषण केल्यानंतर जो अहवाल आला, त्यात असं लक्षात आलं की, स्पूतनिक-५ ची लस दिल्यानंतर ती ९२ टक्के प्रभावी आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये डॉ. रेड्डीजने आणि आरडीआयएफने स्पूतनिक-५ लसीचं क्लिनिकल ट्रायल आणि भारतातील याच्या वितरणासाठी करार केला आहे. करारानुसार भारतात डॉ.रेड्डीजला आरडीआयएफ १ कोटी लशींचा डोस उपलब्ध करुन देणार आहे.