सध्या असा दावा करण्यात येतोय की, डिटर्जेंट-साबणामुळे तुम्ही आजारी पडू शकता. डिटर्जेंटमध्ये केमिकल्सचा अधिक वापर केल्याने त्वचेसह डोळे, फुप्फुसाला इन्फेक्शन होऊ शकतं. हा दावा केल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
अनेक महिला डिटर्जेंटचा वापर करतात. कपडे धुण्यासाठी डिटर्जेंटचाच वापर करतात. त्यामुळे हा आरोग्याचा विषय असल्याने यामागे काय सत्य आहे हे तपासून पाहिलं.त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
कपडे धुण्याच्या डिटर्जेंटमध्ये अॅसिड असतं. डिटर्जेंटमध्ये हार्ड केमिकल्स असतात.सोडियम लॉरेल सल्फेट, सल्फर ट्राईऑक्साईड, एथिलीन ऑक्साईड असे केमिकल्स असल्याने त्वचेसह डोळे, फुप्फुसाला इन्फेक्शन होऊ शकतं.
पडताळणी केल्यानंतर हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील डिटर्जेंटमध्ये काही केमिकल्स वापरले जातात. मात्र, असं असलं तरी कंपनी बनवताना सुरक्षेचा विचार करून बनवते. तरी देखील डिटर्जेंट वापरताना खबरदारी घेतली पाहिजे.