१७ दिवसांच्या बाळाची कोरोना व्हायरसवर मात

आईच्या गर्भातूनच बाळाला कोरोनाची लागण

Updated: Feb 26, 2020, 09:08 AM IST
१७ दिवसांच्या बाळाची कोरोना व्हायरसवर मात  title=

मुंबई : चीनमधून सुरूवात झालेल्या कोरोना व्हायरसची दहशत जगभर पसरली आहे. आतापर्यंत अनेक नागरिक या कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकले आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अद्याप या व्हायरसवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे एकदा तुम्ही या व्हायरसच्या जाळ्यात अडकलात तर जिवंत राहणं कठीण आहे. पण या १७ दिवसांच्या बाळाची सकारात्मक बातमी वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल. 

चीनमध्ये कोरोना व्हायरस झालेल्या गर्भवती महिलेच्या गर्भातील बाळ जन्माच्या अगोदरच या जाळ्यात अडकलं होतं. पण १७ दिवसांचं हे बाळ आता स्वस्थ असून त्याच्यातील व्हायरस निघून गेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणतीही औषध न घेता या बाळाने कोरोना व्हायरसवर मात केली आहे. 

गर्भातच झालं होतं कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन 

चीनच्या वहांमध्ये जन्मलेल्या या मुलीचं नाव सीओ सीओ (Xiao Xiao) असं आहे. तिच्या आईला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. इन्फेक्टेड गर्भवती महिलेने जेव्हा मुलीला जन्म दिला तेव्हा तिला देखील याची लागण झाली होती. यानंतर तिला तात्काळ वहांच्या लहान मुलांच्या रूग्णालयात दाखल केलं. 

श्वसनाला होत होता त्रास 

जन्माच्यावेळी डॉक्टरांनी कन्फर्म केलं की सीओला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे तिला वेगळं ठेवण्यात आलं. मुलीच्या श्वसननलिकेत त्रास होत होता. हृदयाच्या ठोक्यात थोडा त्रास होत होता. यामुळे तिला ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आलं. जास्त त्रास होत नसल्यामुळे मुलीला कोणतीच औषध देण्यात आली नाहीत.