धक्कादायक! ओमायक्रोनचा पेशंट बंगळुरुतून या देशात पळाला...

कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून आलेला एक रूग्ण फरार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. 

Updated: Dec 3, 2021, 02:10 PM IST
धक्कादायक! ओमायक्रोनचा पेशंट बंगळुरुतून या देशात पळाला... title=

बंगळूरू : कोरोनाचा ओमायक्रोन व्हेरिएंट सध्या संपूर्ण जगाची चिंता बनला आहे. अशातच गुरुवारी कर्नाटकामध्ये ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळून आलेत. तर आता कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून आलेला एक रूग्ण फरार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य म्हणजे हा रूग्ण ओमायक्रॉनग्रस्त असून रिपोर्ट येण्याआधीच तो पसार झाल्याची माहिती आहे. या रूग्णाचा जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट येणं बाकी होतं. मात्र त्यापूर्वीच तो 27 नोव्हेंबरला मध्यरात्री तो दुबईला पसार झाला अशी माहिती मिळाली आहे.

हा व्यक्ती जोहान्सबर्गच्या एका लॅबचा तो प्रतिनिधी होता. 20 नोव्हेंबरला तो भारतात आला होता. तो भारतात दाखल झाला तेव्हा त्याच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट होता अशी माहिती मिळतेय. मात्र बंगळुरूच्या एअरपोर्टवर झालेल्या चाचणीत आढळला त्यावेळी तो पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. त्याला वसंतनगरच्या एका स्टार हॉटेलात ठेवण्यात आलं होतं. तो आयसोलेट होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबरला एका प्रायव्हेट लॅबशी संपर्क साधत त्याने निगेटिव्ह रिपोर्ट मिळवला. निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून त्याने हॉटेल सोडलं आणि मग टॅक्सीने तो एअरपोर्टवर गेला. या ठिकाणहून पहाटेच्या विमानाने तो दुबईत पळून गेल्याची माहिती आहे. तो पळून गेल्यामुळे स्थानिक यंत्रणेला धक्का बसलाय.