थंड आणि गरम असं मिक्स पाणी का पिऊ नये? कारण समजल्यावर 'ही' चुक कधीच करणार नाही?

आपल्यापैकी अनेकांना गरम आणि थंड पाणी पिण्याची सवय असते. पण असं थंड आणि गरम पाणी पिणे शरीरासाठी घातक असल्याच संशोधनात दिसून आलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 28, 2024, 12:25 PM IST
थंड आणि गरम असं मिक्स पाणी का पिऊ नये? कारण समजल्यावर 'ही' चुक कधीच करणार नाही? title=

तुमच्यासोबत असंही होतं का की तुम्ही फ्रीजमधून पिण्यासाठी पाणी काढता आणि ते खूप थंड झाल्यावर त्यात गरम पाणी मिसळता? हे अगदी सामान्य आहे. सामान्यपणे लोक असं करतात पण हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, हे शरीरासाठी खूप घातक आहे. 

तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणेस गरम आणि थंड पाणी एक६सोबत प्यायल्याने शरीरासाठी घातक आहे. त्यांनी सांगितलं की, थंड पाणी पचनासाठी जड असते. तर गरम पाणी हलके असते. जेव्हा हे दोन्ही पाणी एकत्र प्यायले जाते तेव्हा त्याचा पचनावर त्याचा परिणाम होतो. 

काय होतो परिणाम 

यासोबतच गरम पाण्यात बॅक्टेरिया नसतात तर थंड पाणी हे दूषित असते. यामुळे थंड आणि गरम पाणी हे शरीरासाठी, आरोग्यासाठी घातक असते. गरम पाणी वात आणि कफ शांत करतो तर थंड पाणी दोन्ही गोष्टी वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे हे पाणी पित्त दोष खराब करण्यास मदतच होते. 

गरम आणि थंड पाणी मिक्स करुन प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. एवढंच नव्हे तर पोठ फुगते एवढंच नव्हे तर शरीरातील पित्ताचे प्रमाण अधिक वाढते. 

कोमट पाणी रक्त वाहिन्यांना पसरवते आणि साफ करते. तर थंड पाणी रक्त वाहिन्यांना संकुचित करते. यामुळे थंड आणि गरम किंवा कोमट पाणी शरीरासाठी घातक ठरते. यामुळे हे पाणी थेट तुमच्या पचनक्रिया आणि पोटावर परिणाम करते. 

याशिवाय पाणी उकळण्याची प्रक्रिया केल्याने ते हलके आणि बॅक्टेरियामुक्त तर होतेच, पण त्यात औषधी गुणधर्मही आहेत ज्यामुळे ते पूर्णपणे स्वच्छ होते आणि आरोग्य सुधारते. तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, गरम पाण्यात थंड पाणि मिसळल्याने खूप प्रमाणात याचे बदल होतात. 

तर मग कसे पाणी प्यायला हवे? 

मातीच्या भांडीत ठेवलेलं पाणी प्यायल्याने ते अमृतासमान असते. हे पाण्याला मूळ स्वभावापेक्षा थंड आणि शुद्ध ठेवते. एवढंच नव्हे तर या पाण्यात खनिजांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावक असते. मातीच्या भांड्यात एक सुसंगत. मध्यम तापमान बनवून ठेवण्यासाठी याचा फायदा होत असल्याच आयुर्वेदात म्हटलं आहे. 

मातीच्या भांड्यातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. मातीच्या भांड्यातील पाणी हे थंड राहण्यास मद केले. एवढेच नव्हे तर शरीर देखील या पाण्यामुळे समतोल राहते.