मुंबई : दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर कॅल्शियम आहे जे हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यात प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात. याशिवाय, दही हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. दही अनेक प्रकारच्या घरगुती उपचारांमध्ये वापरले जाते. हे त्वचेला मॉइस्चराइज आणि मऊ करण्यास मदत करते.
जर दही योग्य प्रमाणात वापरला तर कोलेस्टेरॉल आणि हाय बीपीची समस्या कमी होते. पण त्याचा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच काही लोकांसाठी दही खाणे हानिकारक आहे. त्यामुळे कोणत्या लोकांना दही खाल्याने नुकसान होऊ शकते जाणून घ्या.
दही खाणे हाडे आणि दातांसाठी चांगले आहे. कारण त्यात कॅल्शियम भरपूर असते. परंतु ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी दही खाणे टाळावे कारण त्यांनी दही खाल्ल्याने त्यांच्या वेदनांची समस्या अधिक वाढू शकते.
दम्याच्या रुग्णांसाठी दही हानिकारक आहे. दही खाल्ल्याने श्वसनाशी संबंधित त्रास वाढू शकतात. जर तुम्हाला ही दम्याचा त्रास असेल तर, तर तुम्ही दही खाणे टाळावे. जर तुम्हाला दही खायचे असेल, तर तुम्ही ते दिवसा खाऊ शकता, परंतु रात्री ते खाऊ नका. त्यातील आंबटपणा आणि गोडपणामुळे, म्यूक्सला प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे कफ वाढते.
जर तुम्ही लैक्टोज इनटॉलरेसचे रुग्ण असाल, तर दहीचे सेवन करणे टाळावे. अशा लोकांना दूध आणि दही पचत नाही. जर अशा लोकांनी दही खाल्ले तर, त्यांना अतिसार आणि पोटदुखीची समस्या असू शकते.
अॅसिडिटीची समस्या
जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल, तर तुम्ही दही खाऊ नये. विशेषतः रात्री दही खाऊ नका. त्याचप्रमाणे उडीद डाळ दही सोबत खाऊ नका. असे केल्याने अपचनाची समस्या वाढू शकते.
त्याचप्रमाणे रात्रीचे दही खाल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तरी देखील दही खाणं थांबवावं असे केल्यांने तुम्हाला त्याचा उलट प्रमाण पाहायला मिळेल.