मुंबई : कमी रक्तदाबाला 'हायपोटेंशन' सुद्धा संबोधले जाते. जेव्हा रक्तदाबाचे मापन करण्याऱ्या मशिनमध्ये ९०/६० एमएमएचजी किंवा त्यापेक्षाही कमी रक्ताचे निदान होते, त्यास 'हायपोटेंशन' मानले जाते. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या रक्तदाबाचे प्रमाण फार कमी झालेले असते. तेव्हा चक्कर येणे, थकवा जाणवणे, मळमळणे, श्वास घेण्यास अडथळे निर्माण होणे, त्वचा तेलकट होणे यांसारखे लक्षणे समोर येतात.
आल्याचे सेवन 'हायपोटेंशन'साठी लाभदायक
-आल्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरते. आल्यामध्ये अॅन्टी इंफ्लेमेट्री, अॅन्टी बॅक्टेरियल, अॅन्टी ऑक्सिडेंटशिवाय आणखीही काही पोषक तत्व असतात.
-आल्यामधील या पोषक तत्त्वांमुळे सूज कमी करण्यास तसेच सर्दी-खोकला कमी करण्यास फायदेशीर ठरते.
-सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी आल्याचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-आल्याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्तीही चांगली होती. पित्त झाल्यासही आल्याचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
मिठाचे पाणी 'हायपोटेंशन'साठी लाभदायक
- मिठाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण मिठाचे प्रमाण नेमके किती असावे, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- मिठामध्ये सोडियमचे गुण असल्यामुळे रक्तदाब वाढण्यास मदत होते.
- एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मिठ एकत्र करून प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण मिठ शरीराला तेवढाच घातक पदार्थ आहे. म्हणून एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.