रात्री उपाशी पोटी झोपणं म्हणजे या आजारांना देताय आमंत्रण

रात्री उपाशी पोटी झोपणं म्हणजे या आजारांना देताय आमंत्रण

Updated: Aug 21, 2022, 10:54 PM IST
रात्री उपाशी पोटी झोपणं म्हणजे या आजारांना देताय आमंत्रण title=

Health News : 

चांगल्या आरोग्यासाठी आपण दिवसातून किमान 3 जेवण करणं आवश्यक आहे. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा  कायम राहते. नाष्टा, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण, आरोग्य तज्ञ यापैकी कोणतेही जेवण करू नका असं सांगत नाहीत. जर तुम्ही रात्रीचे जेवण करत नसाल तर तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

तुम्हाला रात्री भूक लागत नाही, तरीही तुम्ही जेवल्याशिवाय झोपू नका. कारण आपलं शरीर चोवीस तास ऊर्जा निर्माण करत असते आणि सतत कॅलरीज बर्न कराव्या लागतात. यासाठी शरीराला पोषक तत्वांची गरज असते जी फक्त अन्नातून मिळते. अन्न वगळल्याने तुमच्या शरीराची प्रक्रिया बिघडते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
 
जर तुम्ही रात्री जेवला नाहीत तर रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते. याचा मोठा फटका आपल्याला बसू शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोरोनरी आर्टरी डिसीजसारखे आजार होऊ शकतात.
 
रात्रीचं जेवण केलं नाही तर रात्री भूक लागल्यानं पोटात दुखणं वाढून झोपेचाही त्रास होऊ शकतो. त्यासोबतच वजनही वाढू लागतं जे अनेक रोगांचे आमंत्रण देतं. त्यासोबतच आपल्या पचनक्रियेवरही याचा परिणाम होतो.