How To Cure Insomnia : दिवसभरच्या कामामुळे शरीर जेव्हा थकतं आणि झोपावसं वाटतं याचाच दुसरा अर्थ म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी आपलं शरीर ऊर्जा बनवत असतं. काही आरोग्य तज्ञांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे, परंतु हे ही तितकंच खरं आहे की प्रत्येकाच्या नशिबात पुरेशी विश्रांती नसते.
कमी झोप घेणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
आजकाल या धकाधकीच्या आयुष्यात 7 ते 8 तास झोप घेणं अवघड होऊन बसलय. पुरेशी झोप न झाल्यानं ही लोक ऑफिसमध्ये थकलेले दिसतात. सलग अनेक दिवस कमी झोप घेतल्याने तुमच्या आरोग्यावर ईतका वाईट परिणाम होऊ शकतो की हे तुमच्यसाठी जीवघेणं ठरू शकतं. म्हणूनच पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
या 2 वाईट सवयींपासून दुर रहा..
वेळ मिळूनही तुमची झोप पूर्ण होत नसेल, तर झोपेचा आजार (Sleep Disorder) टाळण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करू शकता. यामध्ये सर्वात आधी काही वाईट सवयी जितक्या लवकर सोडता येईल तितकंच चांगलं.
1. दारू आणि गांजाचं व्यसन बंद करा
दारू आणि इतर गोष्टींचं व्यसन आरोग्यासाठी नेहमीच वाईट मानलं गेलंय. यामुळे शरीराच्या अनेक अवयवांना गंभीर नुकसान होत असतं, असं असलं तरी काही लोकांची इच्छा असूनही ते ही सवय सोडू शकत नाहीत. नशेमुळे झोप चांगली लागेल असे काहींना वाटतं. पण त्यांच्या व्यसनामुळे झोप येण्याऐवजी पळून जाते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी कधीही दारू आणि इतर नशेच्या गोष्टींचा वापर करु नका. या झोप न येण्याच्या सवयीमुळे तुम्हाला तणाव ही जाणवू शकतो.
2. चुकीची अलार्म सेटिंग
झोपेत असताना अलार्म वाजल्यानंतर आपल्याला जाग येणार नाही हे माहित असतं म्हणून अनेक लोक मोबाईलमधील स्नूझ बटण (Snooze Button) वापरतात. याचा परिणाम म्हणजे अलार्म थोडा वेळ वाजतो आणि लोक तो पुन्हा पुन्हा बंद करतात. तुम्हीही हे असं काही करत असाल तर आजच सोडा. कारण, यामुळे कार्डियोवसकुलर सिस्टम (cardiovascular system) वर ताण निर्माण होतो, जो तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. झी मीडिया याची पुष्टी करत नाही.)