Health News : काहींना झोपताना पाठीवर किंवा पोटावर झोपण्याची सवय असते, तर काहींना कुशीवर झोपायला आवडतं. तुम्ही जर पोटावर झोपत असाल तर त्यामुळे तुम्हाला आरामशीर श्वास घेण्यास मदत होते, परंतु जर तुम्ही अशा प्रकारे सतत झोपण्याची सवय लावली तर त्यामुळे तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपू नये नक्की कोणत्या कारणामुळे त्यांनी सल्ला दिला आहे जाणून घ्या.
पोटावर झोपल्याने पाठीवर आणि मणक्यावर ताण येतो. कारण वजन शरीराच्या मध्यभागी असते. पोटावर झोपल्यानं पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. यामुळे मणक्यांची रचना हलण्याची शक्यता असते. यामुळे पाठीच्या कण्यातील समस्यांमुळे शरीराच्या अनेक भागात वेदना सुरू होतात.
जी लोक पोटावर झोपतात त्यांना अपचन, बद्धकोष्ठता, पोट दुखी यांसारख्या समस्यांचा त्रास असतो. पालथे झोपल्यानं आपल्या पोटावर जास्त प्रमाणात दबाव येतो आणि अन्नपदार्थाचे पचन होण्यास अडचणी निर्माण होतात.
पोटावर झोपल्याने अन्नपचन व्यवस्थित नाही झालं तर तुमचं फॅट वाढू शकतं. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. एकदा का वजन वाढलं की इतर आजार होण्याचा धोका वाढतो.
गरोदरपणात झोपण्याच्या पद्धतीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. या स्थितीत जर नीट झोपला नाहीत तर त्याचा परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो.