घसा खवखवत असेल तर, हे करा...!

घसा खवखवल्याने फारच अस्वस्थ वाटल्यासारखं होतं. खवखवंण दूर होण्यास २ -३ दिवस लागतील हे लक्षात ठेवा.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 10, 2017, 02:07 PM IST
घसा खवखवत असेल तर,  हे करा...! title=

मुंबई : थंडीच्या दिवसात घशाला खव खव होण्याचं प्रमाण जास्त असतं, घरात, ऑफिसमध्ये किंवा रस्त्याने येताना धुळीचा त्रास झाल्यास घसा खव खवतो. घसा खवखवल्याने फारच अस्वस्थ वाटल्यासारखं होतं. खवखवंण दूर होण्यास २ -३ दिवस लागतील हे लक्षात ठेवा.

सर्दी झालीय, ताप आहे की, काय झालंय...

नेमकं कळतंही नाही, सर्दी झालीय, ताप आहे की, काय झालंय, अशा वेळी तुमची काही निरीक्षण महत्वाची आहेत. अतिथंड पाणी पिणे टाळा, थंड पाणी पिण्याची सवय बंद केली, तर तुम्हाला हिवाळ्यातही घसा खवखवण्याचा त्रास होणार नाही, नेहमी साधं किंवा थंड पाणी प्या. यामुळे तुम्हाला दम्याचाही आजार होणार नाही. सर्दी तर विसरूनच जा.

वाफ

घरी गरम पाणी करुन त्याची वाफ घ्या, घशाला बरं वाटेल. दिवसातून २ ते ३ वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते. 

थंडीमध्ये घशाचे इन्फेक्शन होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला येणारा ताप, सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो. पण वाफ घेणे हा घडीला सोपा उपाय असतो, अशा निमित्ताने कोमट किंवा साधं पाणी पिण्याची सवय करा.

गुळण्या 

इतकेच नाही तर ऑफिसमध्ये किंवा बाहेर असल्यास कोमट पाणी आणि मीठ शक्य नसेल, तर साध्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा मोकळा होण्यास सुरूवात होते.

सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे गेल्यास तेही औषधांबरोबर गुळण्या करायला सांगतात. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने त्याचा चांगला परिणाम होतो.

गरम पेय फायदेशीर

चहामध्ये तुळस, लवंग, आले घातल्यास घशासाठी तो जास्त उपयुक्त होतो. असा चहा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला बरं वाटतं.

घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम चहा, कॉफी किंवा सूप प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. 

हे टाळा

साधं किंवा कोमट पाणी प्या, एकदम गरम पाणी पिऊ नका. उगाच जोर जोरात खोंकून घशाला त्रास देऊ नका.