कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय

८३० जणांना कोरोना धोकादायक व्हायरसची लागण झाली आहे.  

Updated: Jan 26, 2020, 05:59 PM IST
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय

मुंबई : सध्या चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसची चर्चा सर्वत्र रंगत आहे. आतापर्यंत या विषाणूने एकूण २५ जणांचा बळी घेतला. तर ८३० जणांना या धोकादायक व्हायरसची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संस्थने (WHO) भारत देशासोबतच अन्य देशांना देखील सतर्कतेचा इशारा देत हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितले आहे. या व्हायरसमुळे सामान्य लोकांचा बळी जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. चीनसोबतच आता थायलँड, सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये देखील या विषाणूचा धोका पसरत आहे. 

या व्हायरचा धोका लक्षात घेत दिल्ली, मुंबई, कोलकाता या राज्यांच्या विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी देखील विमानतळांवर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जगभरात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. 

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय
- सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क साधणे टाळा.
- हात  स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा हॅंड वॉश कायम जवळ ठेवा. 
- मांस आणि अंडी योग्य प्रकारे शिजवून घ्या.
- खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा. 

चीन सरकारने या बातमीला दुजोरा दिल्यानंतर जागतिक आरोग्य संस्थेने संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना वायरसवर अधिक अभ्यास सुरू आहे.