दिल्ली : युनायटेड किंगडममध्ये एका व्यक्तीचं शरीर चक्क दगडाचं बनत चाललंय. तुम्हाला हे वाचून थोड आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे. असं होण्यामागे कारण म्हणज आहे कारण त्याचे स्नायू हाडांमध्ये बदलतायत. यामुळे हा व्यक्ती प्रचंड अस्वस्थ आहे. यामुळे त्याची शारीरिक हालचाल देखील जवळपास बंद झाली आहे.
डेली स्टारमधील रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव जो सूच आहे. जोचं वय केवळ 29 वर्ष आहे. जोला स्टोन मॅन सिंड्रोम (Stone Man Syndrome) आहे. जगभरातील केवळ 700 लोकं या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे.
जोच्या म्हणण्यानुसार, मी मॉन्स्टर बनत जात असल्याचं मला वाटतंय. स्टोन मॅन सिंड्रोमला Fibrodysplasia Ossificans Progressiva देखील म्हटलं जातं. या आजारपणामुळे जो याला व्हिलचेअरची मदत घ्यावी लागतेय. खाणं किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी त्याला दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागतंय.
माझ्या हाडांची सतत वाढ होते आणि मला शरीर लॉक झाल्यासारखं वाटतं. यासाठी माझ्यावर शस्त्रक्रिया देखील होऊ शकत नाही कारण माझ्या शरीरातील हाडांची सतत वाढ होतेय. जेव्हा स्नायू हाडांमध्ये बदलतात त्यावेळी शरीरात चाकू टोचल्याप्रमाणे वेदना जाणवत असल्याचं, जो याने सांगितलंय.
समोरून पाहिल्यावर या आजाराचा व्यक्ती नीटनेटका दिसतो मात्र त्याची परिस्थिती फार गंभीर असते, असंही त्याचं म्हणणं आहे.