मुंबई : बद्धकोष्ठतेमुळे शरीरात अनेक आजार होतात. वाईट सवयी, पाण्याची कमतरता, फायबरयुक्त आहाराचा अभाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. जेवणानंतर न चालणे हे देखील बद्धकोष्ठता वाढवू शकते. बद्धकोष्ठतेमुळे पोट पूर्णपणे साफ होत नाही. बद्धकोष्ठतेमुळे आळस आणि थकवा येतो. याशिवाय त्या व्यक्तीचे मन कुठेच लागत नाही.
बहुतेक लोक या प्रकारची समस्या टाळण्यासाठी अनेक प्रकारची औषधे घेतात. परंतु हे सर्वज्ञात आहे की औषधांचे अतिसेवन आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. अशा स्थितीत, बद्धकोष्ठतेच्या वेळी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा
कोरफड
कोरफडीचा रस आपली त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता असल्यास दोन चमचे कोरफडीचा रस दोन चमचे पाण्यात मिसळून प्या. ज्यूस आणि नारळाच्या पाण्यासोबतही याचे सेवन करू शकता. लक्षात ठेवा की कोरफडीचा रस रिकाम्या पोटी प्यावा. जर तुम्ही कोरफडीचा रस पहिल्यांदाच घेत असाल तर ते फक्त कमी प्रमाणात घ्या. कोरफड पाचन तंत्र बरे करते.
बदाम
बदामामध्ये भरपूर पोषक घटक असतात. बदामामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. जे बद्धकोष्ठता होऊ देत नाहीत. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाऊ शकता. प्रौढांना दिवसातून फक्त 4 ते 5 बदाम आणि मुलांना 2 ते 3 बदाम द्या.
मनुका
फायबर युक्त मनुका खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते आणि आरोग्यासाठी ही ते खूप फायदेशीर आहे. याचे सेवन करण्यासाठी 10 ते 15 मनुके रात्रभर सामान्य पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा.