कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे? तर तातडीने पहिल्या या गोष्टी करा

जर तुम्हाला कोरोनाची लक्षणं दिसत असतील किंवा कोरोना झाल्याचा संशय आला तर आपण ताबडतोब काही उपाययोजना केल्या पाहिजेत.

Updated: Jan 12, 2022, 03:56 PM IST
कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे? तर तातडीने पहिल्या या गोष्टी करा title=

मुंबई : देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून अनेकजणं या व्हायरसच्या विळख्यात अडकताना दिसतायत. कोरोनाचे विविध व्हेरिएंट्स देखील बऱ्याच राज्यांमध्ये पसरलेले आहे. बाहेरची परिस्थिती पाहता साधं सर्दी आणि खोकला असलेल्या व्यक्तींच्या मनातही कोरोना झाल्याची भीती दिसून येते. जर तुम्हाला कोरोनाची लक्षणं दिसत असतील किंवा कोरोना झाल्याचा संशय आला तर आपण ताबडतोब काही उपाययोजना केल्या पाहिजेत. जेणेकरून या आव्हानाला वेळीच सामोरे जाण्यास मदत होईल.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला थोडीशीही शंका असेल की तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा. जेणेकरून या संसर्गाची वेळीच तपासणी करता येईल. कोरोनाची झालाय हे समजण्यासाठी त्याची चाचणी होणं आवश्यक आहे.

स्वतःला आयसोलेट करा

कोरोना झाल्याची शंका आल्यास ताबडतोब स्वतःला ओयसोलेट करा. कारण कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आहे. जर बाधित व्यक्ती तोंडावर रुमाल न ठेवता शिंकत असेल तर त्याचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात आला असाल तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कोरोना झाल्याची गोष्ट लपवू नका

जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर तुम्ही ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून अजिबात लपवू नका. कारण असं केल्याने तुमच्या संपर्कात आलेले लोकं अडचणीत सापडू शकतात. 

कोरोना झाल्यानंतर संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला द्या. बर्‍याच वेळा, बहुतेक प्रकरणांमध्ये, कोरोना संक्रमित व्यक्तीला ताप, खोकला, थकवा आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. वेळीच काळजी घेऊन ही लक्षणं समजून उपाययोजना करता येतात.