रात्री कोमट पाण्यासोबत घ्या 3 पदार्थ, सकाळी एका झटक्यात साफ होईल पोट

Constipation Home Remedy : बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका करण्यासाठी घरगुती उपाय ठरतील अतिशय महत्त्वाचे.  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 30, 2023, 05:10 PM IST
रात्री कोमट पाण्यासोबत घ्या 3 पदार्थ, सकाळी एका झटक्यात साफ होईल पोट  title=

How To Treat Constipation At Home : कॉन्स्टीपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या हल्ली सगळ्याच लोकांमध्ये पाहायला मिळते. चुकीचा आहार, घाणेरडी जीवनशैली, तासन् तास बसून काम करणे, बाहेरच खाणं खाणे आणि स्ट्रेस यासारख्या कारणांमुळे शौचाला साफ होत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. 

मल घट्ट आणि कडक असल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही. या कारणामुळे सतत जडपणा आणि पोट दुखण्यासारख्या समस्या जाणवतात. बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्यास पोटात जळजळ, गॅस, आंबट ढेकर आणि मळमळ सारखी समस्या जाणवते. एवढंच नव्हे तर खूप दिवस बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास मुळव्याध म्हणजे पाईल्स सारख्या आजारांचा त्रास होतो. 

बाजारात अनेक औषधे उपाय म्हणून आहेत. तसेच अनेकदा त्रास जास्त बळावला तर ऑपरेशन हा एकच पर्याय राहू शकतो. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाहने आपल्या इंस्टाग्रामवर घरगुती उपाय सुचवला आहे. ज्यामुळे तुम्हाला शौचाला अतिशय साफ आणि मऊसूद होऊ शकते. अगदी पोट साफ होण्यासाठी टॉयलेटमध्ये तासन् तास बसण्याची काहीच आवश्यकता नाही. 

बद्धकोष्ठता साफ करणारे 3 पदार्थ 

1 कप पाणी 
1 चमचा घरगुती तूप 
1/2 चमचे मीठ 

कसा करावा वापर 

सगळ्या अगोदर पॅनमध्ये एक कप पाणी उकळा 
त्यानंतर हे पाणी कपात घेऊन थोडं कोमट होऊ द्या 
यामध्ये एक चमचा घरगुती तूप आणि अर्धा चमचा मीठ टाका 
हे मिश्रण चमच्याने चांगल ढवळून घ्या 
त्यानंतर बसून हे संपूर्ण मिश्रण प्या 

रात्री पडेल फरक 

जर तुम्ही रात्री जेवल्यानंतर हे मिश्रण प्यायलात तर चांगला फरक पडेल. जेवण पचवण्यासाठी याची मदत होईल आणि मल मऊ बनण्यास मदत करेल. यामुळे सकाळी पोट अगदी झटक्यात साफ होईल. 

बद्धकोष्ठतेवर तूप फायदेशीर 

तूप हे अतिशय नैसर्गिक लॅक्सेटिव म्हणून ओळखलं जातं. यामुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडण्यास मदत होतं. कोमट पाणी प्यायल्यामुळे कडक शौच देखील अतिशय साफ होते. यामुळे टॉयलेटला गेल्यावर स्टूल सहज पास होते. बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरू शकतो. बद्धकोष्ठतेमध्ये किंवा पाईल्समध्ये तूप शौचाच्या जागी लावल्यास जळजळ किंवा मल कडक होण्याचा त्रास कमी होतो.