Diet Plan: तारक मेहता फेम 'बबीता जी' कशी राहते फीट, शेअर केला डायट प्लान

तारक मेहताची 'बबिता जी' कशी तंदुरुस्त राहते? 

Updated: Jul 19, 2022, 05:07 PM IST
Diet Plan: तारक मेहता फेम 'बबीता जी' कशी राहते फीट, शेअर केला डायट प्लान title=

Munmun Dutta Diet Plan: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शो मधील सर्वांची आवडती व्यक्तिरेखा बबिताजी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. बबिता जी उर्फ ​​मुनमुन दत्ताच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. 

मुनमुन दत्ता फिटनेससाठी खास डाएट प्लान फॉलो करते, अभिनेत्रीचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे. मुनमुनने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आपली उजळती त्वचा आणि फिट फिगर मागचे रहस्य सांगितले आहे. मुनमुनने सांगितले की ती दिवसभरात काय खाते.

मुनमुन दत्ता शोमध्ये जितकी ग्लॅमरस दिसते, तितकीच ती खऱ्या आयुष्यात ही बोल्ड आणि स्टनिंग आहे. तिचा दिवस कसा सुरू होतो, ती खाण्यावर कशी नियंत्रण ठेवते हे अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. संपूर्ण दिवसाचा प्लॅन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मुनमुनने सांगितले की, ती पहाटे साडेपाच वाजता उठते आणि आधी भरपूर पाणी पिते. यानंतर मुनमुन जिममध्ये जाते. 

जिमला जाण्यापूर्वी मुनमुन नक्कीच काहीतरी खाते जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळेल. अभिनेत्री जिमच्या आधी एक केळी आणि काही ड्रायफ्रुट्स किंवा भिजवलेले बदाम खाते. मुनमुन वर्कआऊटनंतर नाश्ता नक्कीच करते. ज्यामध्ये ती फळांसोबत पोहे, उपमा, दूध अशा गोष्टी खाते.

हेल्दी डाएट फॉलो करणारी मुनमुन दत्ता सांगते की, अनेकांना जेवणासोबत कोला प्यायला आवडते, पण ते खूप चुकीचे आहे. हे करू नये. कारण एका ग्लास कोलामध्ये किमान 6 चमचे साखर असते, जी तुमच्या शरीराला हानी पोहोचवते. अभिनेत्रीने सांगितले की ती दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी सफरचंद सायडर व्हिनेगर पिते.

मुनमुनने सांगितले की ती खरी बंगाली आहे, त्यामुळे ती दुपारच्या जेवणात अस्सल पदार्थ खाण्यास प्राधान्य देते. आपल्या मोलकरणीलाही तिने विशेष सूचना दिल्या आहेत. दुपारच्या जेवणात, घरी शिजवलेले साधे अन्न, ज्यामध्ये भात, मसूर, हिरव्या भाज्या असतात. मुनमुन दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात सलाड आणि तूप एकत्र घेते.

मुनमुनला गरमागरम पराठे खायला आवडतात, पण डाएटमुळे ती जास्त खात नाही. मुनमुनने सांगितले की, यानंतर संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये ती फळे, क्विनोआ आणि हलक्या शिजवलेल्या भाज्या यासारख्या हलक्या गोष्टी खाते. त्यानंतर मुनमुनने स्वतः चहा बनवला, ज्यामध्ये तिने जिंजर आणि लेमन ग्रास टाकला आहे.

यानंतर रात्रीच्या जेवणाची वेळी, ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितले की तिला रात्री खूप हलके खाणे आवडते, ज्यामध्ये ती डाळ खिचडी सारख्या गोष्टी घेते. पण त्याआधी ती प्री-डिनरमध्ये टोस्ट आणि सिंगल फ्राय अंडी खाते. मुनमुनने सांगितले की, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही दिवसातून 6 मिल लहान भागांमध्ये घेणे आवश्यक आहे.