मुंबई : देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. राज्यात रूग्णांची संख्या वाढत आहे. तर रूग्ण संख्या वाढत असल्यामुळे औषधांची मागणी देखील वाढली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटे दरम्यान असे म्हटले जात आहे की, कोविड उपचारात लठ्ठपणा एक मोठे आव्हान बनले आहे. लठ्ठ असलेल्या रूग्णांना कोरोनावर मात करण्यासाठी अधिक काळ लागतो. कारण त्यांच्या शरीराची हालचाल मर्यादित होते. त्याच वेळी लठ्ठ रूग्णांना हायर व्हेंटिलेशन प्रेशरची गरज असते.
ज्या तरूणांनी गेल्या वर्षभरात पोटाकडची चरबी वाढवली आहे, अशा तरुणांना लठ्ठ व्यक्ती म्हणून जास्त धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत फिटनेसकडे योग्य लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
विशेषज्ञ डॉ. इमरान नूर मोहम्मद म्हणाले की, ओटीपोट जास्त आल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते. छाती आणि ओटीपोटातील चरबीमुळे फुफ्फुस संकुचित राहतात. ज्यामुळे फुफ्फुसांना काम करणे कठीण होते. लठ्ठ रूग्णांना मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरची गरज भासते. असा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे.
सेनगुप्ता रुग्णालयाचे संचालक डॉ. शंतनु सेनगुप्ता म्हणाले की, 'ज्या लोकांना लसी मिळाली आहे आणि नियमित व्यायाम करणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता कमी असते. आम्हाला आशा आहे की कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. पण प्रत्येकाने रोज 1 ते 2 तास व्यायम करून फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. '