मुंबई : देशात ओमायक्रोन व्हेरिएंटचे 4 रूग्ण आढळून आले आहेत. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण या व्हायरसचं हे बदललेले स्वरूप अधिकाधिक लोकांना संक्रमित करतंय शिवाय त्यांच्यावर परिणामही करतं. दरम्यान यावर आता ICMR च्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की, या विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाची आक्रमकता ही त्याची सर्वात मोठी कमजोरी आहे.
डॉ. समीरन पांडा, मुख्य एपिडेमियोलॉजिस्ट, ICMR म्हणतात की, जो विषाणू जास्तीत जास्त पसरतो तो प्राणघातक असू शकत नाही. यासाठी केवळ पुरावेच नाहीत, तर वैज्ञानिक तथ्यांवरून ही गोष्ट सांगितली जातेय. त्यामुळे लोकांनी या विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाची विनाकारण भीती बाळगण्याची गरज नाही. पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
संसर्ग अधिक असल्याने ओमायक्रोन घातक नाही असं आयसीएमआरने म्हटलंय. वेगाने प्रसार होणाऱ्या म्युटंटचा प्रभाव कमी असतो असं सिद्ध झालंय.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे मुख्य एपिडेमियोलॉजिस्ट डॉ समीरन पांडा म्हणतात की, ओमिक्रॉन व्हेरिएंट, डेल्टा आणि इतर व्हेरियंटमध्ये आतापर्यंत केलेल्या अभ्यासादरम्यान फक्त असं आढळून आलंय की ज्या बदललेल्या फॉर्ममध्ये जास्तीत जास्त आक्रमकता होती त्याचा लोकांवर फार कमी प्रभाव असल्याचं दिसून आलं.
याच कारण सांगताना डॉ. समीरन पांडा म्हणतात की, बदललेलं स्वरूप ज्यामध्ये लक्षणं अतिशय सौम्य असतात आणि त्यांच्यात संसर्गाची क्षमता जास्त असते. ते त्यांचा परिणाम दाखवू शकत नाहीत.
डॉ समीरन पांडा असा दावा करतात की, या प्रकरणांपासून मोठा बचाव म्हणजे लसीकरण आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं. सध्याच्या परिस्थितीत लोकांनी घाबरून न जाता या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी दिलेल्या उपायांचं पालन केलं पाहिजे.