ओमायक्रॉननंतर कोरोनाचा अजून एक व्हेरिएंट येणार?

डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आणि अधिक जीवघेणा असू शकतो. 

Updated: Feb 9, 2022, 02:51 PM IST
ओमायक्रॉननंतर कोरोनाचा अजून एक व्हेरिएंट येणार? title=

मुंबई : केवळ भारतातच नाही तर जगभरात कोरोनाच्या व्हेरिएंटने थैमान घातलं आहे. सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसतायत. मात्र याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आणि अधिक जीवघेणा असू शकतो. 

डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञ डॉ. मारिया वान केरखोव यांनी सांगितलं की, कोरोनाची महामारी अद्याप संपलेली नाही. कोरोनाचे यापुढे येणारे व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य असतील. 

मारिया पुढे म्हणाले की, कोरोनाचा पुढील व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असेल. याचा अर्थ असा आहे की, सध्या होत असलेल्या नुकसानामुळे अधिक नुकसान होऊ शकतं. 

डॉ. मारिया यांच्या सांगण्यानुसार, कोरोनाचा पुढील व्हेरिएंट प्रतिकारशक्ती कमी करू शकतो आणि यावर लसीचा प्रभाव देखील कमी असू शकतो. ओमायक्रॉनच्या लाटेत, गंभीर आजार आणि मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी ही लस प्रभावी असू शकते.