‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी ठरतायत धोकादायक

अनेकदा आपल्याला खाण्याच्याही चुकीच्या सवयी असतात.

Updated: Jul 31, 2021, 01:56 PM IST
‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी ठरतायत धोकादायक title=

मुंबई : आपल्या प्रत्येकाला काही सवयी असतात. यामध्ये काही सवयी चांगल्या असतात तर काही वाईट..खाण्याच्या बाबतीतही काही सवयी असतात. अनेकदा या सवयी चुकीच्या असू शकतात. आपल्याला जरी माहिती असलं की या सवयी चुकीच्या आहेत तरीही आपण त्यांना बदलत नाही. मात्र असं करणं तुमच्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरू शकतं. 

तर जाणून घेऊया अशा खाण्याच्या कोणच्या सवयी आहेत ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात
 

  • कमी खाणं किंवा न खाणं हा वजन कमी करण्याचा उपाय नाही. त्यापेक्षा बराच काळ भूक लागल्याने तुमचं वजन वेगाने वाढतं. त्याचप्रमाणे शरीर कमकुवतही होतं. म्हणून, बराच वेळ उपाशी राहण्याची सवय सोडा. जास्त खाणं टाळण्यासाठी एकाच वेळी भरपूर अन्न ठेवा. दिवसभरातून एकदा फळं, हिरव्या भाज्या, रस, निरोगी स्नॅक्स घ्या.
  • प्रत्येकाला झोपायला आवडतं. मात्र निरोगी शरीरासाठी आठ तासांची झोप पुरेशी मानली जाते. मात्र तुम्हाला दररोज बर्‍याच वेळ अंथरुणावर पडून राहिलो किंवा उशीरा उठलो तर ते देखील आपल्यासाठी हानिकारक आहे. हे केवळ लठ्ठपणा वाढवणार नाही तर बर्‍याच आजारांना निमंत्रण मिळतं.
  • अनेकांना उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते. परंतु बेड टीची सवय तुमच्या आरोग्यासाठी मोठी हानिकारक आहे. सकाळी चहा प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या वाढते. त्याचप्रमाणे रिकामी पोटात साखरेमुळे स्थूलपणा देखील वाढतो. त्याऐवजी कोमट पाण्याने दिवसाची सुरूवात करण्याची सवय लावा. दररोज सकाळी एक ते चार ग्लास पाणी रिकाम्या पोटी प्या.
  • रात्रीचे जेवण झाल्यानंतर पायी चालायला जाणं आवश्यक आहे. चालल्यामुळे जेवण व्यवस्थित पचलं जाईल. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर, काही काळ चालून आलं पाहिजे.