Harmful Healthy Habits : निरोगी आरोग्यासाठी चांगल्या सवयी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण चांगल्या वाटत असलेल्या या सवयी शरीरासाठी घातक ठरत आहेत. दररोज वेळेवर झोपणे आणि उठणे, ताजी फळे आणि भाज्या खाणे, योगासने किंवा व्यायाम करणे या सवयी चांगल्या आरोग्याचे लक्षण असू शकतात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, काही आरोग्यदायी सवयी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात कारण तुम्ही या सवयी चुकीच्या वेळी फॉलो करता. अशा आरोग्यदायी सवयींबद्दल ज्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
शरीरातील डिहायड्रेशन टाळण्यासाठी, लोकांना दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यापेक्षा जास्त पाणी प्यायल्यास ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. जास्त पाणी प्यायल्याने मळमळ, उलट्या किंवा शरीरात सूज वाढणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. या स्थितीला वॉटर टॉक्सिसिटी म्हणतात. यामुळे अस्वस्थता आणि मूड बदलू शकतात.
(हे पण वाचा - पुरुषांच्या ताकदीसाठी Vitamin B12 महत्त्वाचं, 10 पदार्थांच्या सेवनाने व्हाल स्ट्राँग)
आपल्या देशात असा कोण असेल ज्याला जेवणानंतर मिठाई खायला आवडत नाही? गाजराचा हलवा असो की खीर, जेवणाच्या शेवटी थोडे गोड खाल्ल्याने लोकांचा मूड सुधारतो. त्याचबरोबर अनेकांना जेवणानंतर मिठाईऐवजी गोड फळे खायला आवडतात. पण, तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर फळे खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात.
(हे पण वाचा - ऋजुता दिवेकरने सांगितलं पचनक्रिया सुधारण्याचे 5 सिक्रेट, पोट 2 मिनिटांत होईल साफ)
सुकामेवा हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. स्नॅकिंगसाठी काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांसारख्या ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. शरीरासाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या हेल्दी फॅट्ससाठीही या ड्रायफ्रुट्सचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने हाडे आणि सांध्याशी संबंधित समस्या कमी होतात. पण, जर तुम्ही लवकर किंवा मोठे फायदे मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्सचे सेवन केले तर ते फायद्याऐवजी नुकसानच करते. जास्त प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते.