Apple Side Effects: सफरचंद आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती असेलच. यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजार टाळता येतात. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे. परंतु इतके फायदे असूनही काही लोकांसाठी सफरचंदाचे सेवन हानिकारक ठरू शकते. सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. काही आजारांमध्येही सफरचंद खाल्ल्याने रुग्णाची सध्याची स्थिती बिघडू शकते.
ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो त्यांनी जास्त प्रमाणात सफरचंद खाणे टाळावे. वास्तविक, त्यात फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. पण फायबरचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात गॅस, दुखणे आणि पेटके यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
डायबिटिसचे रुग्णांनी सफरचंदाचे सेवन करणे टाळावे. त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत, मधुमेहाच्या रुग्णांनी ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
काही लोकांना सफरचंद खाल्ल्याने एलर्जीची समस्या उद्भवू शकते. यामुळे त्यांना त्वचेवर खाज येणे, पुरळ येणे, सूज येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला सफरचंदाची ऍलर्जी असेल तर चुकूनही त्याचे सेवन करू नका.
लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी सफरचंदाचे जास्त सेवन करू नये. त्यात कॅलरीज आणि साखर मोठ्या प्रमाणात आढळते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सफरचंदाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.
अतिसाराचा त्रास असलेल्यांनी सबबचे सेवन करू नये. वास्तविक, त्यात भरपूर फायबर असते. ज्यामुळे आतड्याची हालचाल वाढते. अशा स्थितीत याचे सेवन केल्यास डायरियाची समस्या आणखी वाढू शकते.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
24/0(9 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.