Cholesterol वाढण्याचे संकेत देतात 'हे' 3 अवयव, जाणून घ्या संपूर्ण माहिती

त्वचेतील बदल हे कोलेस्टेरॉल वाढण्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक मानले जाते. कोलेस्टेरॉल शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करते.

Updated: Mar 28, 2022, 08:39 PM IST
Cholesterol वाढण्याचे संकेत देतात 'हे' 3 अवयव, जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तसेच लोक काही मिळेल ते अन्न खातात, ज्यामुळे लोकांच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल देखील वाढते, जे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. परंतु कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरात कोणते बदल होतात हे फार कमी लोकांना माहिती असतात. ते जर तुम्हाला कळालं तर ते त्याला रोखणं सोपं होत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीराच्या 'या' 3 अवयवांबद्दल सांगणार आहोत. ज्यातील बदलांमुळे तुम्हाला कॉलेस्ट्रॉलची माहिती मिळेल आणि तुम्ही योग्य वेळी उपचार करु शकाल.

कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत

त्वचेतील बदल हे कोलेस्टेरॉल वाढण्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक मानले जाते. कोलेस्टेरॉल शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करते. हे दोन प्रकारचे असते, खराब कोलेस्टेरॉल म्हणून कमी घनतेचे लिपोप्रोटीन आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून उच्च घनतेचे लिपोप्रोटीन.

खराब कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

या कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते

असे मानले जाते की अन्नामध्ये जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट आणि कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने ही, समस्या वाढते. यासोबतच लठ्ठपणा, धूम्रपान आणि काही औषधांचे सेवन यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते.

उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे

-कोलेस्टेरॉल वाढल्याने डोळ्यांमध्येही बदल होऊ लागतात. असे मानले जाते की, जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा रुग्णांना डोळ्याच्या कॉर्नियाच्या बाहेरील भागाच्या वर किंवा खाली निळ्या किंवा पांढऱ्या घुमटासारखे काहीतरी दिसते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कोलेस्टेरॉलची चाचणी नक्कीच करून घ्यावी.

- याशिवाय, जर तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागला असेल तर थोडे सावध व्हा कारण हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण आहे.

- जर तुमचे हात दुखत असतील तर तुम्ही लक्ष द्यावे. असे मानले जाते की, वारंवार हात दुखणे हे चांगले लक्षण नाही, यामुळे देखील हृदय विकाराचा धक्का बसू शकतो.