या ५ गोष्टी करतील सतत येणाऱ्या घामापासून सुटका!

तुम्हाला खूप घाम येतो?

Updated: May 4, 2018, 11:23 AM IST
या ५ गोष्टी करतील सतत येणाऱ्या घामापासून सुटका! title=

मुंबई : तुम्हाला खूप घाम येतो? आणि त्यामुळे होणारा त्रास अगदी नकोसा झालाय.  उन्हाळ्यात तर ही समस्या अधिक वाढते. घाम, चिकचिक यामुळे जीव अगदी नकोसा होतो. मेकअप, लूक खराब होतो. त्वचा आणि केसांचे होणारे नुकसान तर वेगळेच. पण आता काळजी करू नका. या काही गोष्टी तुमची सतत येणाऱ्या घामापासून सुटका करतील. तुम्हालाही सतत घाम येण्याची समस्या असल्यास हे उपाय करुन पहा... 

#1. ड्राय शाम्पू हे शाम्पू स्प्रे किंवा पावडर फॉर्म मध्ये मिळतात. खूप घाम येणार्यांसाठी हे उत्तम आहेत. कारण घाम आल्याने ऑईली स्काल्फ ही समस्या असतेच. त्यामुळे केस डल दिसू लागतात. 

#2. फूट स्प्रे पायाला घाम येण्याच्या समस्येला अनेकाजण सामोरे गेले असतील. त्यामुळे वास न घेण्यासारखे होणारे मोजे आणि पायाला येणारी दुर्गंधी अगदी नकोशी होते. त्यावर बेस्ट उपाय म्हणजे फूट स्प्रे. लहान बॉटल्स मध्ये ही मिळत असल्याने तुम्ही अगदी सहज कॅरी करू शकता.

#3. वेट व्हाईप्स घाम आल्यानंतर तोंड पुसायला नॉर्मल टिशूज वापरण्यापेक्षा अँटीपर्स्पिरंट व्हाईप्सने फेस क्लीन केल्यास अधिक फ्रेश वाटते आणि तुमचा बॉडी ओडर मेन्टेन्ट राहतो.

#4. अँटीपर्स्पिरंट हॅन्ड लोशन घामाने ओलसर झालेले हात कामात व्यतय तर आणतातच परंतु शेक हॅन्ड करताना किंवा सगळ्यांसोबत वावरताना जरा अनकॉन्फिडन्ट वाटू लागतं. प्रत्येक वेळी हात धुणं किंवा पुसणं शक्य होत नाही. अशा वेळी अँटीपर्स्पिरंट हॅन्ड लोशन वापरा नि बिनधास्त वावरा.

#5. घाम येणाऱ्यांना माहीतच असेल की सनस्क्रीम लावल्यावर अधिक घाम येतो. पण सनस्क्रीम लावणं तर गरजेचं आहे. अशा वेळी ऑइल फ्री सनस्क्रीमचा पर्याय आपल्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला येणारा अतिरिक्त घाम नियंत्रित होईल आणि तुम्ही दिवसभर कंम्फरटेबल राहू शकाल.