लाल रंगाची लिपस्टिक लावताना 'या' गोष्टीचं भान ठेवा

लाल रंगाची लिपस्टिक ही एव्हरग्रीन लिपस्टिक रंगांपैकी एक आहे. 

Updated: May 20, 2018, 07:08 AM IST
लाल रंगाची लिपस्टिक लावताना 'या' गोष्टीचं भान ठेवा  title=

 मुंबई : लाल रंगाची लिपस्टिक ही एव्हरग्रीन लिपस्टिक रंगांपैकी एक आहे. गोर्‍या मुलींना लाल आणि मॅट स्वरूपातातील लिपस्टिक खूपच खुलून दिसते. आजकाल फॅशनमध्ये लाल आणि मॅट स्वरूपातील लिपस्टिक वापरण्याचा ट्रेन्ड आहे. मग ही लिपस्टिक वापरताना तुम्ही स्टाईल, फॅशनच्या दृष्टीनेही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व अजून खुलून दिसण्यास मदत होईल.   

 लाल रंगाची लिपस्टिक लावताना कोणत्या गोष्टींचं भान ठेवाल ?   

 #1 लाल रंगाची लिपस्टिक लावणार असाल तर त्यासोबत कोणत्या रंगाचे कपडे अधिक खुलून दिसतील याचा अवश्य विचार करा. प्रामुख्याने पांढरे, न्यूड किंवा नेव्ही ब्ल्यू रंगाचे कपडे घाला. यासोबत लाल रंगाची लिपस्टिक अधिक खुलून दिसते.
 
 #2 लाल रंगाची लिपस्टिक घेताना ती मरून किंवा पर्पल शेडमध्ये जाणारी नसेल याची काळजी घ्या. रक्तासारखा लाल किंवा नारंगी रंग अधिक चांगला दिसतो. 
 
 #3 अचानक  लाल भडक रंगाची लिपस्टिक लावणं तुम्हांला जमत नसेल तर सुरूवातीला लाल लिपनायनर वापरा. हळूहळू लाल रंगाचे ग्लॉस वापरा. 
 
 #4 सावळ्या रंगाच्या मुलींनी लाल रंगाऐवजी त्यामध्ये थोड्या ब्राऊन रंगाची निवड करा. 
 
 #5 पातळ ओठ असतील तर ग्लॉस फिनिश असणार्‍या लिपस्टिक निवडा तर मोठ्या ओठांच्या मुलींना मॅट लिपस्टिक वापर. मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी या '6' गोष्टींचं भान ठेवा
 
 #6 लाल रंगाची लिपस्टिक ब्रशने लावण्याऐवजी बोटांनी ओठांवर लावा. मध्यापासून सुरूवात करून हळूहळू बाजुला पसरवा. यामुळे ओठांचा रंगही नॅचरल वाटेल. 
 
 #7 दोन रंगाचा वापर करणार असाल तर लाल रंग लावण्यापूर्वी प्रायमरचा वापर करा. यामुळे लाल रंग अधिक उठू दिसेल. 
 
 #8 ओठांचा आणि नेल पॉलिशचा रंग कधीच सारखा ठेवू नका. लाल रंगाची लिपस्टिक आणि नेलपेंट एकत्र लावू नका. 
 
 #9 लाल रंगाची लिपस्टिक लावणार असाल तर डोळ्यांचा आणि चेहर्‍याचा मेकअप थोडा कमी ठेवा.