Uttarakhand, Rishikesh Ganga Aarti: उत्तराखंड मध्ये वसलेलं ऋषिकेश (rishikesh) जगभरातील लोकांसाठी आकर्षणचं केंद्र बनले आहे. तिथे लाखोंच्या संख्येत देशी-विदेशी पर्यटक येतात. हे ठिकाण त्याच्या धार्मिक कार्य आणि सुंदरतेसाठी ओळखले जाते. तिथे जाऊन लोक गंगा नदी मध्ये आवर्जून स्नान करतात. हे ठिकाण अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी (Adventure Sports) सुद्धा प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर, तिथे तुम्ही बंजी जम्पिंग, जाईंट स्विंग आणि राफ्टिंगसारख्या अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता. ऋषिकेशला 'योग नगरी' सुद्धा म्हटलं जातं. ऋषिकेश मधील गंगा आरती जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्ही कधीही ऋषिकेशला गेला तर तिथल्या गंगा आरतीमध्ये नक्की सहभागी व्हा. तिथे दर संध्याकाळी घटांवर गंगा आरतीसाठी लोकांची गर्दी हमखास जमते. ही आरती फक्त दिसायला भव्य नाही तर तुम्हाला मानसिक शांतता सुद्धा देते. असं म्हटलं जातं की प्रत्येकाने एकदा तरी ऋषिकेशच्या गंगा आरती मध्ये सहभागी व्हायला हवं.
ऋषिकेशची गंगा आरती पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. आरतीच्या वेळी मंत्रोच्चारण, दीव्यांचा प्रकाश आणि संध्याकाळच्या वेळी मोकळ्या आकाशात गंगा नदीला पाहणं स्वर्गाहून कमी नाही. हे वातावरण कोणत्या जादूपेक्षा कमी नसते. तिथे जाऊन तुम्ही अध्यात्मिकता मध्ये हरवून जाऊ शकता. या जागेच्या वैशिष्ट्याला शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. या आरतीचा अनुभव असा असतो की जो तुम्हाला आत्मशांती देतो.
ऋषिकेश मध्ये जवळपास सर्वच घाटांवर आरती होते. जेव्हा आरती सुरू होते तेव्हा हजारो दिवे उजळतात. यामुळे नदीवर सोनेरी चमक येते. हे मनोरम दृश्य तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जातं. यामुळे तुम्हाला सकारात्मकता जाणवते.
ऋषिकेशला 'योग नगरी' या नावाने ओळखलं जातं. तिथे अनेक ठिकाणी योग करण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. तसेच तिकडे योग शिकवणारे अनेक क्लासेस उपलब्ध आहेत. तिथल्या वाहत्या गंगा नदीची शांतता, दरीखोऱ्या सारखी थंड हवा आपल्याला अशा शांततेची जाणीव करुन देते जी इतर कुठेही अनुभवता येणार नाही.
तिथली स्थानिक परंपरा आणि संस्कृतींना जाणून घेणं किंवा त्यांना बघणं हा देखील एक सुंदर अनुभव असू शकतो. तुम्ही गंगा आरती आणि इतर मंदिरांच्या आरतीमध्ये सहभागी होऊन ऋषिकेशच्या रुढी-परंपरांना चांगल्या तऱ्हेने समजू शकता.
जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर गंगा आरतीची झलक तुम्ही तुमच्या कॅमेरात कैद करायला विसरू नकात. इथला दीव्याचा प्रकाश, पाणी आणि रंग सगळे एकत्र मिळुन छान दृश्य बनवतात.
गंगा आरतीची वेळ ही ऋतू आणि दिवसाच्या प्रकाशावर निर्धारित असते. सामान्यत: संध्याकाळची आरती सूर्यास्तानंतर होते. हिवाळ्यात संध्याकाळी 6 वाजता आणि उन्हाळ्यात संध्याकाळी 6:30 च्या आसपास आरतीला सुरुवात होते.