मूळ्यासोबत हे '2' पदार्थ खाणं आरोग्याला धोकादायक

मूळ्याची भाजी आरोग्यदायी असली तरीही अनेकदा त्याच्या उग्र वासामुळे त्याचा आहारात समावेश करण्यासाठी नाकं मुरडली जातात.

Updated: Jun 11, 2018, 10:21 AM IST
मूळ्यासोबत हे '2' पदार्थ खाणं आरोग्याला धोकादायक  title=

मुंबई : मूळ्याची भाजी आरोग्यदायी असली तरीही अनेकदा त्याच्या उग्र वासामुळे त्याचा आहारात समावेश करण्यासाठी नाकं मुरडली जातात. अनेकजण मूळ्याचा वापर सलाड, पराठे अशा पदार्थांमधून करतात. अनेक पोटाचे आजार दूर करण्यासाठी मूळ्याची भाजी फायदेशीर ठरते. पण मूळ्याची भाजी खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणं टाळा. 

फायदेशीर मूळ्याची भाजी 

मूळ्याच्या भाजीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न घटक मुबलक असतात. मूळ्याच्या नियमित सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. मात्र हे आरोग्यदायी असले तरीही त्यासोबत काही पदार्थ खाणं त्रासदायक ठरू शकते. मुळ्याच्या पानांचे हे ९ फायदे

मूळ्यासोबत कोणते पदार्थ टाळावेत? 

मूळ्यासोबत कारल्याचा रस पिणे टाळा. मूळा आणि कारलं एकत्र खाल्ल्याने पोटामध्ये रिअ‍ॅक्शन होण्याचा धोका असतो. त्यानंतर काहींना श्वास घेताना त्रास होऊ शकतो. हार्ट अटॅकचा धोका संभवतो. त्यामुळे कारलं आणि मूळ्याच्या सेवनामध्ये किमान 24 तासाचे अंतर ठेवा. 

मूळ्याच्या सेवानानंतर संत्र्याचे त्रास पिणं त्रासदायक आहे. मूळा आणि संत्र्याचं रस हे कॉम्बिनेशन पोटामध्ये एकत्र येऊन विषारी बनू शकते. यामुळे पोट खराब होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे संत्र आणि मूळा खाण्यामध्ये किमान 24 तासांचे अंतर ठेवा. आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !