सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोना रूग्णांची संख्या 2500 च्या वर

सध्या देशामध्ये एक्टिव्ह रूग्णांटी संख्या 16308 वर पोहोचली आहे.

Updated: May 28, 2022, 01:33 PM IST
सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोना रूग्णांची संख्या 2500 च्या वर title=

मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी कोरोनाची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,685 नवीन रुग्ण आढळलेत.  तर दुसरीकडे 2,158 रुग्ण बरे झाले आहेत. यादरम्यान 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशामध्ये एक्टिव्ह रूग्णांटी संख्या 16308 वर पोहोचली आहे. तर पॉझिटीव्हिटी रेट 0.60% आहे.

देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,31,50,215 झाली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात आणखी 33 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 5,24,572 वर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 494 ने वाढली आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे सर्वाधिक 479 लोक बरे झाले आहेत. त्यानंतर केरळमध्ये 480, महाराष्ट्रात 329, हरियाणामध्ये 246 आणि यूपीमध्ये 131 ने लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 

आतापर्यंत देशात एकूण 4,26,09,335 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणीबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 24 तासांत 4,47,637 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. 14,39,466 लोकांना कोरोना लस देण्यात आली.