डोळा फडफडण्याची काय आहेत शास्त्रीय कारणं; एकदा जाणून घ्या

डोळा लवणे या प्रक्रियेला म्योकिमिया म्हणतात.

Updated: Sep 16, 2022, 10:18 PM IST
डोळा फडफडण्याची काय आहेत शास्त्रीय कारणं; एकदा जाणून घ्या title=

Eye Twitching: डोळा लवणे म्हणजे शकून किंवा अपशकून असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. परंतु डोळा लवण्यामागे शास्त्रीय कारण आहे. डोळ्यांमधला मज्जातंतू किंवा स्नायू हलायला लागल्यामुळे तुमचा डोळा लवायला सुरुवात होते. डोळा लवण्याची नक्की कारणं काय आहेत हे जाणून घ्या. 

1. कामाचा जास्त ताण हे डोळे लवण्याचं मुख्य कारण असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

2. रात्रीची झोप कमी झाली तरीही डोळे लवण्याचं प्रमाण वाढू शकतं. कामाच्या वेळी लक्ष केंद्रीत करताना डोळ्यांचा वापर जास्त होतो. त्यातच झोप कमी झाली असेल तर पापणी फडफडते. 

3. चहा आणि कॉफीमध्ये असलेली उत्तेजक द्रव्यही डोळा लवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तुम्ही चहा आणि कॉफीचं जास्त सेवन करत असाल तर शरीरात कॅफेनचं प्रमाण वाढत आणि कॅफेनमुळेही डोळे लवण्याचा त्रास होतो. 

4. तुम्ही तुमच्या चष्म्याचा नंबर अथवा चष्म्याच्या काचा नियमित बदलणे गरजेचे असते. मात्र असे न केल्यास डोळ्यांवर ताण येतो. त्याचप्रमाणे सतत डोळ्यांवर ताण येईल असे काम केल्याने देखील हा ताण वाढवू शकतो .यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करा. 

डोळा लवणे या प्रक्रियेला म्योकिमिया (myokymia) म्हणतात. यामध्ये फक्त एकाच डोळ्याची पापणी फडफडते आणि काही वेळानंतर आपोआप तुमचा डोळा व्यवस्थित होतो. शरीरातले इतर स्नायू नियंत्रणाबाहेर गेल्यावर जसं होतं तसंच डोळ्यांच्या बाबतही होतं. परंतु तज्ञांच्या मते यात काहीच काळजी करण्याचे कारण नसते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.)