IVF Process : वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये IVF फेल होते ?...काय आहेत समज-गैरसमज

 IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मतःच विकृती असते ? असं म्हटलं जात नक्की असं का म्हटलं जात हे खाली दिलेल्या ,माहितीतून तुम्हाला समजेल   

Updated: Jan 6, 2023, 09:14 AM IST
IVF Process :  वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये IVF फेल होते ?...काय आहेत समज-गैरसमज title=

IVF Process Myths and Facts : सध्या बदललेली जीवनशैली, कामाचे ताण-तणाव, (lifestyle) खाण्यापिण्याच्या सवयी, धूम्रपान, व्यसन या सर्वांचा आरोग्यावर प्रचंड परिणाम पाहायला मिळतोय, महिलांमध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणेचे प्रमाण खूप कमी होऊ लागलं आहे. पण सायन्स आणि टेक्नॉलॉजि यांच्या जोरावर आयव्हीइफ सारख्या तंत्रज्ञानाने अश्या महिला ज्यांना आई व्हायचंय पण होऊ शकत नाही अश्यांसाठी वरदान म्हणूनच काम केलं आहे. (ivf treatment myths and facts know the truth)

आयव्हीएफ बाबतीत बरेच समज गैरसमज आहेत त्याविषयीचं आज जाणून घेऊया. 

  • गैसमज : आईवीएफ उपचार इन्फर्टिलिटी संबंधात सर्व  समस्या दूर करते  आणि या उपचारात गर्भधारणेचे प्रमाण 100 टक्के असतं. 
    सत्य : हे खरं नाहीये, आयव्हीएफ उपचारांमध्ये नेहमीच यश मिळेल असं नाही बऱ्याचदा दाम्पत्याचा राहणीमान आरोग्य यावर अवलंबून असत त्यानुसार अपयशसुद्धा येऊ शकत. 
     
  • गैरसमज : वजनाने जास्त असलेल्या व्यक्ती IVF उपचारांमध्ये अपयशी होतात.  
    सत्य:  तुमच्या शरीराच्या ठेवणीवरसुद्धा बऱ्याचदा हे उपचार अवलंबून असतात पण जर तुमचं राहणीमान आरोग्य चांगलं असेल तुम्ही हेल्दी असाल तर, वजन जास्त असूनही तुम्ही गर्भधारणा करू शकता. 
     
  •  गैरसमज : IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मतःच विकृती असते ?
    सत्य : हे वाक्य साफ खोटंआहे की , IVF  द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये विकृती असते असं काहीही नाहीये एक सामान्य गर्भधारणेद्वारे जन्म झालेल्या बाळाप्रमाणेचं ते बाळ सुद्धा असतं, कुठलंही व्यंग किंवा अनैसर्गिक वाढ अश्या बालकांमध्ये नसते. 
     
  • गैरसमज : रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, आयव्हीएफ नंतर बेड रेस्ट खूप महत्वाचं आहे.तुम्ही फार हालचाल करू शकत नाही . 
    सत्य : आईवीएफ उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये बेडवर पडून राहण्याची काहीही गरज नसते, केवळ अंडी रिलीज करण्यासाठी हॉस्पिटललाल महिलेला जावं लागतं पूर्ण बेड रेस्ट केल्याशिवाय तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. 
     
  • गैरसमज : आईवीएफ मध्ये यश म्हणजे तुमच्या जीवनशैलीवर अवलंबुन आहे. 
    सत्य : हे काही अंशतः खरं मानलं तर हरकत नाही,कारण बदलती जीवनशैली आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करते हे आपण मेनी करायलाच हवा आणि याचा सरळ परिणाम गर्भधारणेवर होतो. इतकंच काय तर आपण जो ताण तणाव घेतो त्याच थेट गर्भधारणेवर  होत  आहे असं अभ्यासातून निदर्शनास आलं आहे.