मुंबई : सेक्श्युअली ट्रांसमिटेड डिसीज म्हणजेच लैंगिक आजार शारीरिक संबंधांमुळे पसरू शकतात. एका अहवालानुसार, 2020 मध्ये भारतातील जवळपास 3 करोड लोकांना सेक्श्युअली ट्रांसमिटेड डिसीजचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. सेक्श्युअली ट्रांसमिटेड डिसीज हा सामान्य संसर्ग आहे मात्र लोकं याबाबत खुलेपणाने बोलत नाहीत.
महिलांमध्ये सेक्श्युअली ट्रांसमिटेड डिसीजचा धोका जास्त असल्याचं दिसून येतं. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा जननेंद्रिय अधिक संवेदनशील असतं. त्यामुळे त्यांना हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
STDवर वेळीच उपचार होणं गरजेचं आहे. कारण यामुळे इतर गंभीर आजार जडण्याची शक्यता असते. यामुळे महिलांना पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीज होण्याची शक्यता अधिकच बळावते.
एकूण 35 प्रकारचे लैंगिक आजार आहेत. यामध्ये अधिकतर लैंगिक आजार हे ह्युमन पेपिलोमावायरस (HPVs) हर्पीज, सिफलिस, हेपेटाइटिस, गोनोरिया, क्लॅमाइडिया आणि ह्यूमन इम्युनोडेफिशिएंसी वायरस (HIV) आहेत. मात्र या व्यतिरीक्त देखील अजून लैंगिक आजार आहेत. यातील काही आजार है लैंगिक संबंधांमधून नाही तर ब्लड ट्रान्स्फ्यजनमधून पसरतात.
सेक्श्युअली ट्रांसमिटेड डिसीजवर उपचार नाही केले तर वंधत्वाचा धोका उद्भवू शकतो. हा धोका पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असतो. गोनोरिया आणि क्लॅमाइडिया फेलोपियन ट्युबमध्ये पसरल्याने त्याचा प्रभाव फर्टिलीटीवर पडतो. परिणामी गर्भधारणा होण्यास समस्या जाणवू शकतो.
काही सेक्श्युअली ट्रांसमिटेड डिसीज हे लक्षणविरहीत असतात. याचा अर्थ हे इन्फेक्शन लक्षणांविना कोणामध्येही दिसत नाही. अशी कोणतीही स्पष्ट लक्षणं नाहीत ज्यामुळे डॉक्टर थेट सांगू शकतात की तुम्ही लैंगिक आजाराने ग्रस्त आहात. विशेषतः हर्पिस आणि क्लॅमाइडिया निदान केलं जाऊ शकत नाही कारण यामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.