मुंबई : डोळे ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. पण अनहेल्दी लाईफस्टाईल, केमिकल्स, प्रदूषण यामुळे डोळे खराब होतात. त्यांचे आरोग्य बिघडते. तसंच आजकाल वाढलेला कॅम्प्युटर, लॅपटॉपचा, मोबाईलच्या वापरामुळेही डोळ्यांचे आरोग्य बिघडते. अशा या धावपळीत डोळ्यांचे आरोग्य बिघडू नये म्हणून खास टिप्स...
# आठवड्यातून एकदा डोळ्यांना आय लोशन, त्रिफळा चुर्ण किंवा गुलाबपाण्याने साफ करा. त्यामुळे डोळ्यात गेलेली धूळ, माती, किटाणू दूर होतील आणि डोळ्यांची चमक वाढेल. ही '६' लक्षणे देतात डोळे थकल्याचे संकेत!
# सकाळच्या वेळेस हिरवळीवर अनवाणी चालण्याने देखील डोळ्यांना आराम मिळतो. उन्हात बाहेर पडताना सनगॉसेस किंवा छत्रीचा वापर अवश्य करा. या '३' कारणांसाठी हिरवळीवर अनवाणी चालणे ठरते फायदेशीर!
# टी.व्ही. थोडा दूरुनच पाहणे योग्य ठरेल. दिवसभर कॅम्प्युटरवर काम करत असाल तर अॅँटी ग्लेअर चश्मा वापरणे फायद्याचे ठरेल.
# रात्री उशिरापर्यंत जागल्याने आणि सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यासाठी वेळेवर झोपा आणि ६-८ तासाची झोप पूर्ण करा.
# डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी काम करताना मध्ये मध्ये डोळे बंद करत जा आणि त्यावर दोन्ही हातांचे तळवे हलकेच ठेवा. डोळ्यांना आराम मिळेल.
# काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा आणि आरामात झोपा. काही मिनिटातच डोळ्यांचा थकवा कमी होईल. कच्च्या बटाट्याच्या रसात कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होतील.