मुंबई : भरपूर पाणी पिण्याचे महत्त्व आपण सर्वच जाणतो. तसंच उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे अधिक तहान लागते, त्यामुळे आपसुकच जास्त पाणी प्यायले जाते. पण इतर वेळेस का? भरपूर पाणी पिणे आरोग्यास हितकारक असते, हे आपण जाणतोच. मात्र कितीही लक्षात ठेवून पाणी प्यायचे ठरवले तरी ते साध्य करता येत नाही. अशावेळी या काही टिप्समुळे तुम्ही पाणी पिण्यास मोटीव्हेट व्हा किंवा आता पाणी प्यायला हवे हे लक्षात येईल.
#1. आपण अधिकतर वेळ कंम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर घालवतो. त्यामुळे कंम्प्युटर किंवा लॅपटॉप स्क्रीनवर पाणी प्या असे लिहून ठेवा. घरी असताना तुम्ही हे टी.व्ही. स्क्रीनवर लिहून ठेवू शकता.
#2. आपल्या मित्रांना किंवा आजूबाजूला बसणाऱ्या कलिगना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यास सांगणे.
#3. प्रत्येक वेळेस आपल्या आजूबाजूला पाण्याचा जग किंवा बॉटल भरून ठेवा.
#4. पाणी पिण्याची आठवण करणारे अनेक अॅप्स आहेत. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी पिण्यास तुम्हाला मदत होईल.
#5. स्टिकी नोट्स सर्वात उत्तम उपाय आहे. तुमच्या आसपास अशी पाणी प्यावे, असे लिहून एक स्टिकी नोट ठेवा.