पावसाळ्यात त्वचा विकार टाळण्यासाठी खास टीप्स

  पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो. 

Updated: Jul 5, 2018, 08:58 PM IST
पावसाळ्यात त्वचा विकार टाळण्यासाठी खास टीप्स  title=

मुंबई :  पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो. म्हणून तो टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा यामधून काही त्वचाविकारांचा धोका बळावण्याची शक्यता वाढते. 

पावसाळ्यात कोणती काळजी घ्याल ? 

त्वचा नेहमी कोरडी ठेवा. कारण ओल्या त्वचेला विशेषतः पावसाळ्यात इन्फेकशन होण्याचा धोका अधिक असतो. जर तुम्हाला त्वचेचे इन्फेकशन झाले असेल तर अँटी फंगल पावडरचा वापर करा.

ओले कपडे वापरू नका. तसंच ओले झालेले शूज अधिक वेळ पायात ठेऊ नका. ते लगेच बदला. कारण ओल्या कपड्यांमुळे तुम्हाला सर्दी होऊन तुम्ही आजारी पडू शकता. तसंच त्वचेचे इन्फेकशन आणि आजार होण्याची देखील संभावना असते.

पावसात भिजणे टाळा. बाहेर पडताना नेहमी छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा. तरी देखील पावसात भिजलात तर केस, अंग पुसून कोरडे करा. अन्यथा आजारी पडू शकता.

घरी आल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर पाय स्वच्छ धुवा. पावसातील चिखल व घाणीमुळे त्वचेचे इन्फेकशन होण्याची शक्यता असते. तसंच नखं कापा किंवा स्वच्छ ठेवा. कारण त्यामुळे देखील इन्फेकशनचा धोका वाढतो.

त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी स्त्रिया सलोनमध्ये जातात. पण त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घेत नाहीत. असे न करता त्वचेच्या समस्यांसाठी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. कारण त्यावर त्वचा तज्ज्ञ योग्य तो वैद्यकीय उपचार करतील.