मुंबई : अभ्यास, ऑफिसचे काम, कौटुंबिक समस्या, आरोग्याची समस्या यांसारख्या अनेक कारणांमुळे ताण येतो. तणाव हा जीवनाचा एक भाग झाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काहीही असो तणावाला आपण बळी पडतोच. पण या तणावामुळे शारीरिक-मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आजारांचा धोका वाढतो. पण काही साध्या सोप्या उपयांनी तुम्ही तणावापासून दूर राहु शकता. पाहुया कोणते आहेत ते उपाय...
# बाहेर फिरायला जा. मोकळ्या हवेत काही काळ चालल्याने नकारात्मकता दूर होईल. मित्रपरिवार किंवा कुटुंबियांसोबत पिकनिकला जावू शकता.
# एक सुगंधी मेणबत्ती लावा. मंद सुवास आणि प्रकाश तुमचा मूड नक्की चांगला करेल.
# फुगे फुगवा. काही रंगीबेरंगी फुगे फुगवा आणि ते तुमच्या आसपास ठेवा. पाहा तुम्हाला किती छान वाटेल.
# गाणे गा. तुमच्या आवडीचे गाणे गा.
# संत्र्याचा ज्युस घ्या. तणाव वाढवणारे कॉर्टिसोल हार्मोन संत्र्याचा ज्युस प्यायल्याने कमी होतात.