ऑफिसमध्ये कामाचा ताण दूर करण्यासाठी फॉलो करा या ५ टिप्स!

ऑफिसमध्ये तासंतास एका जागी बसून काम केल्याने मेंदू थकतो. 

Updated: May 10, 2018, 12:32 PM IST
ऑफिसमध्ये कामाचा ताण दूर करण्यासाठी फॉलो करा या ५ टिप्स! title=

मुंबई : ऑफिसमध्ये तासंतास एका जागी बसून काम केल्याने मेंदू थकतो. याचा थेट परिणाम कामावर होतो आणि ताण जाणवू लागतो. तुमच्यासोबतही असेच काही होत असेल तर तुम्ही या टिप्सने तुमचा ताण कमी करु शकता. ताण कमी झाल्याने तुमचे कामही चांगले होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या परफॉर्मन्सवरही होईल. परिणामी पगारवाढ चांगली होण्याची शक्यताही वाढेल. तसंच तुम्ही फ्रेश आणि स्ट्रेसफ्री रहाल.

सतत बसून काम करु नका

सतत बसून काम केल्याने ताण वाढतो. त्यामुळे थोड्या वेळाने जागेवरुन उठा. फेरफटका मारा. तुम्हाला थोडे रिलॉक्स वाटेल.

मध्ये मध्ये काहीतरी खात रहा

मध्ये मध्ये काहीतरी खाल्याने मेंदू शांत राहण्यास मदत होते. खाल्याने मन दुसऱ्या ठिकाणी गुंतते. ऊर्जा मिळते. आणि रिफ्रेशिंग मूडमध्ये तुम्ही पुन्हा कामाला सुरुवात करु शकता.

गॉसिप करायला विसरु नका

गॉसिप करणे प्रत्येकालाच आवडते आणि ऑफिसमध्ये गॉसिप होणार नाही, हे तर शक्यच नाही. मग कामामधून ब्रेक घेते आपल्या फ्रेंड्स, कलिगसोबत गप्पा मारा, गॉसिप करा. अशाप्रकारे एन्जॉय केल्याने स्ट्रेस कमी होईल.

टी ब्रेक जरुर घ्या

सातत्याने काम केल्याने मेंदूवर ताण येतो. थकवा जाणवतो. अशावेळी चहा-कॉफीसाठी जरुर ब्रेक घ्या. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.