लॉस एंजेलिस : पुरुषाने कधी बाळाला जन्म दिल्याचं तुम्ही ऐकलंय. पण आता ऐका, कारण खरंच एका पुरुषाने बाळाला जन्म दिला आहे. ही कोणती सिनेमातील गोष्ट नव्हे तर एका ट्रान्सजेंडर पुरुषाने बाळाला जन्म दिला आहे. अमेरिकेतून ही घटना समोर आली आहे.
बाळाला जन्म दिल्यानंतर, ट्रान्सजेंडर पुरुषाने सांगितलं की, मी एक पुरुष आहे आणि मी मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे मला वाटते की, तुम्ही गर्भधारणा स्त्री असण्याशी जोडणं थांबवलं गेलं पाहिजे.
37 वर्षीय बेनेट कॅस्पर-विलियम्स याने सांगितलं की, 2011 मध्ये पहिल्यांदा समजलं की तो ट्रान्स आहे. परंतु पुढील तीन वर्षात त्याने स्वतःमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यानंतर 2017 मध्ये तो त्याचा भावी पती मलिकला भेटला आणि दोघं 2019 मध्ये विवाहबंधनात अडकले.
लग्नानंतर या जोडप्याला मूल हवं होतं. त्यासाठी बेनेटने टेस्टोस्टेरॉन हार्मोन थेरपी घेतली. या थेरेपीच्या माध्यमातून बेनेटची अंडाशय काम करू लागली कारण त्याची बॉटम शस्त्रक्रिया झाली नव्हती.
त्यानंतर लवकरच, बेनेट गरोदर राहिला आणि त्याने आणि मलिक यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये सिझेरियनद्वारे त्यांच्या मुलाला, हडसनला जन्म दिला.
बाळाला जन्म दिल्यानंतर बेनेट त्याचा अनुभव शेअर करताना म्हणाला, हा एक सरळ किंवा सोप निर्णय नव्हता. मला माहित होतं की माझ्या शरीरात गर्भधारणा होण्याची शक्यता आहे.
बेनेट म्हणाला, हे इतकं महत्त्वाचे आहे की आपण 'मातृत्व' या शब्दात 'स्त्रीत्व' परिभाषित करणं थांबवलं पाहिजे.