रिकाम्या पोटी व्यायाम धोकादायक? सतर्क रहा; होऊ शकते 'ही' समस्या

 तुम्ही पण रिकाम्या पोटी व्यायाम करता मग आताच थांबा, कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

Updated: Aug 16, 2022, 12:19 PM IST
रिकाम्या पोटी व्यायाम धोकादायक? सतर्क रहा; होऊ शकते 'ही' समस्या title=
trending news empty stomach exercise is good or bad know its benefits and side effects in marathi

Empty Stomach Exercise - कोरोना महासंकटानंतर अनेक लोक फिटनेस प्रेमी झाले आहेत. आजकालची तरुण पिढी फिट राहण्यासाठी जीम जाते. भरपूर चालते, सायकल चालवते. तर तरुणी बारीक होण्यासाठी रिकाम्या पोटी व्यायाम करतात. तुम्ही पण रिकाम्या पोटी व्यायाम करता मग आताच थांबा, कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढीच तोटेदेखील आहे. रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे तुमचं वजन कमी होतं पण तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. शिवाय रक्तातील साखरेची पातळी देखील कमी होऊ शकते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात रिकाम्या पोटी व्यायाम करणे कितपत योग्य आहेत ते. (trending news empty stomach exercise is good or bad know its benefits and side effects in marathi)

पहिले आपण जाणून घेऊयात की रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे काय काय फायदे आहेत ते.

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे फायदे

वजन कमी होण्यास मदत

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना जिममध्ये सकाळी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे आपल्या एनर्जीचा उपयोग होतो आणि त्यामुळे फॅट बर्न होतं. त्याशिवाय रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि तुम्हाला ताकद मिळते. 

प्रतिकारशक्ती मजबूत होते 

रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. व्यायाम केल्यामुळे शरीराचे अवयव तंदुरुस्त राहतात. 

आता जाणून घ्या तोटे

रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला उलट्यांचा त्रास आणि अस्वस्थ वाटू शकतं. यातून तुम्हाला स्नायूंना दुखापत होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे व्यायाम करण्याच्या साधारण 2 तासांपूर्वी काही तरी खावं. काही खाणं शक्य नसेल तर कोमट पाण्यात लिंबू घालून पिण्याचा सल्ला दिला जातो. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांनी वर्कआउट करण्यापूर्वी डिटॉक्स ड्रिंक पिणे फायदेशीर ठरतं. तुम्ही मिल्क शेक किंवा बदाम शेक देखील पिऊ शकता. 

  (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)