Thyroid वर रामबाण उपाय, तुळशी आणि एलोवेरा थायरॉइडची समस्या करेल दूर

तुळस आणि कोरफडीचा वापर करूनही हा आजार कमी करता येतो.

Updated: Mar 26, 2022, 02:33 PM IST
Thyroid वर रामबाण उपाय, तुळशी आणि एलोवेरा थायरॉइडची समस्या करेल दूर title=

Thyroid control : थायरॉइड (Thyroid) आज एक मोठी समस्या बनत चालली आहे. अनेकांना आज थायरॉइडची समस्येचा सामना करावा लागत आहे. थायरॉइडने ग्रस्त व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत. ही समस्या आता सामान्य झाली आहे. शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. सहसा ही समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. अशा स्थितीत महिलांचे वजन वाढू लागते, तसेच शरीर कमजोर होते. (Tulsi and Aloe Vera May Reduce Thyroid)

लठ्ठपणामुळे अनेक आजारांना देखील आमंत्रण मिळतं. त्यामुळे अशा समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तुळशीचे पान खूप फायदेशीर ठरू शकते. तुळस आणि कोरफडीचा वापर करूनही हा आजार कमी करता येतो. चला तर मग जाणून घेऊया या दोघांच्या वापराने थायरॉईडची समस्या कशी कमी होऊ शकते.

तुळशीच्या पानांचे फायदे 

तुळशीच्या (Tulsi) पानांचे सेवन केल्यास अनेक समस्यांसोबतच थायरॉईडच्या अनेक लक्षणांपासून आराम मिळतो. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-वायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे थायरॉइडची समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होतात.

तुळस आणि कोरफडीचा रस

थायरॉइडपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढा आणि त्यात एक चमचा कोरफडीचा (Aloe Vera) रस मिसळा, त्यानंतर त्याचे सेवन करा. असे केल्याने थायरॉईड नियंत्रण करता येते. याशिवाय तुळशीच्या चहाचे सेवन करू शकता. दुधाशिवाय चहामध्ये तुळशीची पाने टाकून प्या. यामुळे थायरॉईडही नियंत्रणात येऊ शकते.