हळद आरोग्यासाठी उपयुक्त

हळदीमुळे जेवनाला तर चव येतेच पण आपल्या आरोग्यासाठी हळद फार गुणकारी आहे.

Updated: May 16, 2019, 07:10 PM IST
हळद आरोग्यासाठी उपयुक्त title=

मुंबई : हळदीचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये होतो. हळदीमुळे जेवनाला तर चव येतेच पण आपल्या आरोग्यासाठी हळद फार गुणकारी आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा हळदीचे प्रमाण फार असते. हळदीच्या वापराने त्वचा नितळ मुलायम आणि सुंदर होते. आपल्याकडे नेहमीच म्हणतात 'पी हळद आणि हो गोरी'. जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण हळदीच्या वापरामुळे प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे.

१) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन असते. ते औषध म्हणून काम करते, शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.

२) तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते. 

३) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात. 

४) अनेक रिसर्च नुसार हळद रोज खाल्याने पित्त वाढते त्यामुळे जेवण पचण्यात मदत होते. 

५) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते. 

६) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते. 

७) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो. 

८) बायोकेमिस्‍ट्री आणि बायोफिजिकल रिसर्च नुसार हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप २ च्या डायबिटीजचा धोकाही टळतो. 

९) शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते.