स्त्रीला मासिक पाळी येते, त्या दरम्यान शरीरातून रक्तस्त्राव होतो. या काळात, संसर्ग होण्याचा धोका असू शकतो, ते टाळण्यासाठी पॅड, टॅम्पन्स आणि मासिक पाळीचे कप वापरले जातात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनेक आजारांपासून संरक्षण देणारा हा टॅम्पन दोन सख्ख्या बहिणींच्या जीवाला धोका निर्माण केला आहे. 'द सन'च्या अहवालानुसार, या वर्षी मे महिन्यात, 21 वर्षीय डेविन जॉन्सनला टॅम्पॉनमुळे टॉक्सिक शॉक सिंड्रोम झाला, ज्याचे रूपांतर सेप्सिसमध्ये झाले. 30 दिवसांनंतर तिची धाकटी बहीण जया देखील त्याच संसर्गामुळे रुग्णालयात पोहोचली. दोघेही मृत्यूच्या अगदी जवळ होत्या अनेक दिवस आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (ref.) नुसार, सेप्सिस ही एक जीवघेणी स्थिती आहे. ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या संसर्गावर जास्त प्रतिक्रिया देते. ते स्वतःच्या शरीरातील ऊती आणि अवयवांचे नुकसान करू लागते. हे टॉक्सिक शॉक सिंड्रोममुळे असू शकते.
टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा एक दुर्मिळ, जीवघेणा जीवाणू संसर्ग आहे. बहुतेकदा हे स्टॅफिलोकोकस ऑरियस बॅक्टेरियाद्वारे तयार केलेल्या विषामुळे होते. ही एक अतिशय धोकादायक स्थिती आहे. जी महिलांना खूप त्रास देऊ शकते.
मासिक पाळीच्या काळात महिलांना या जिवाणू संसर्गाचा धोका जास्त असतो. असे मानले जाते की टॅम्पन वापरल्याने संसर्गाचा धोका वाढतो, जो विषारी शॉक सिंड्रोममध्ये बदलू शकतो. त्यामुळे महिलांनी त्यांचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)