मुंबई : तुम्ही अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील जेव्हा एका महिलेने एकाच वेळी तीन किंवा चार मुलांना जन्म दिला. पण हे प्रकरण वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. यूकेमध्ये राहणाऱ्या एका महिलेने एका वर्षात 3 मुलांना जन्म दिला. यामध्ये त्या महिलेने एकाच वेळी तिळ्या बाळांना जन्म दिला नाही. ही महिला 10 महिन्यांत दोनदा गर्भवती झाली आणि तीन मुलांना जन्म दिला आहे.
द सन मधील एका वृत्तानुसार, 23 वर्षीय शैरना स्मिथने 2020 मध्ये 6 जानेवारी रोजी पहिल्या मुलाला जन्म दिला. यानंतर ती पुन्हा गर्भवती राहिली आणि 30 ऑक्टोबर रोजी जुळ्या मुली अलिशा आणि अलीझा यांचं स्वागत केलं.
शैरनाने सांगितले की, जेव्हा तिचा मुलगा लायटन तीन महिन्यांचा होता तेव्हा तिला कळलं की ती पुन्हा गर्भवती आहे. ती म्हणाली की, मला माझ्या दुसऱ्या गर्भधारणेबद्दल जाणून आश्चर्य वाटलं कारण माझा मुलगा फक्त 3 महिन्यांचा होता. तिच्यासाठी आणखी धक्कादायक म्हणजे जेव्हा ती तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांनी तिला सांगितले की, ती जुळ्या मुलांची आई होणार आहे. हे अनोखं प्रकरण डॉक्टरांसाठीही धक्कादायक होतं.
शैरना पुढे म्हणाली, 'डॉक्टरांचं ऐकून मला आश्चर्य वाटले. मी आनंदी किंवा दु:खी व्हावं हे मला समजू शकलं नाही. कारण मुलांचे वडील आणि माझं काही काळापूर्वी ब्रेकअप झालं होतं. आम्ही आता एकत्र नव्हतो. शर्नाची तिन्ही मुलं आता एक वर्षाची झाली असून ती 3 मुलांसह अत्यंत आनंदी आहे.