मुंबई : पोटदुखी हे अनेक आजारांमध्ये वरचेवर आढळणारे लक्षण आहे. मात्र पोटाच्या ज्या भागात वेदना जाणवतात त्यानुसार संबंधित आजाराचे काही संकेत मिळू शकतात. म्हणूनच हा त्रास नेमका कशाबद्दल होतोय ? हे जाणून घेण्यासाठी हा एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या.
उजवा भाग - उजव्या बाजूला वेदना होणे हे प्रामुख्याने अॅपॅडिंक्सच्या दुखण्याचे संकेत देतात. स्त्रियांमध्ये नाळीच्या खालच्या बाजूला दुखणे हे ओव्हारीजच्या दुखण्याचे संकेत देतात.
डाव्या बाजुला - पोटाच्या डाव्या बाजूला वेदना जाणवणे हे किडनी स्टोनच्या समस्येचे लक्षण आहे. त्यामुळे वेळीच चेकअप करून त्याचे निदान करा.
मध्यभागी दुखणे - पोटाच्या मध्यभागी दुखणे हे अल्सर किंवा गॅस्ट्रिकच्या समस्यांमध्ये आढळते. वेदना खूप तीव्र होण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटाचा वरचा भाग - या भागात वेदना होणं हे अॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटाच्या खालील भाग - या भागात वेदना जाणवणे हे ब्लॅडर इंफेक्शन किंवा युरीनरी ट्रॅक इंफेक्शनचे लक्षण आहे. मासिकपाळीच्या दिवसातही काही स्त्रियांना या भागात वेदना जाणवतात.
हा सल्ला केवळ प्राथमिक महितीसाठी आहे. त्यामुळे अंदाज लावून आणि वैद्यकीय सल्ला न घेता थेट उपचार करणं टाळा. कोणत्याही शारिरीक दुखण्याकडे दुर्लक्ष करणे आणि स्वतः औषध उपचार करणं आरोग्याला धोकादायक ठरू शकते.