मुंबई : देशात गर्भपाताच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणावर डॉक्टर चिंता व्यक्त करत आहेत. त्याचे मुख्य कारण आहे, असुरक्षित गर्भपात. ज्यामुळे महिलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असतो. पद्मश्री डॉ. के.के. अग्रवाल यांच्या माहितीनुसार, देशामध्ये असुरक्षित गर्भपात स्त्रियांच्या अकाली मृत्यूचे मुख्य कारण आहे.
डॉ. के. के. अग्रवाल यांच्या माहितीनुसार, 'गर्भपातावर प्रतिबंध लावण्यासाठी महिलांना गर्भावस्था करण्यापासून थांबावता येत नाही. त्यामुळे गर्भ समाप्त करण्यासाठी अनेक उपायांची मदत घेतली जाते, आणि हे उपाय महिलांच्या आरोग्यास घातकही ठरू शकतात.'
देशाच्या अनेक भागांमध्ये गर्भनिरधकावर योग्य औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनियोजित गर्भवस्थेच्या दरात वाढ होताना दिसत आहे. असे वक्तव्य हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी कले आहे.
असुरक्षित गर्भपात
गर्भपातावर वापरण्यात येणारी औषधे प्रभावी आणि सुरक्षित असायला हवीत. त्याचप्रमाणे औषधांचा वापर कशा प्रकारे करावा याची पूर्णत: माहिती असायला हवी. त्यामुळे ही औषधे महिलांच्या जीवावर बेतू शकत नाहीत.
गर्भनिरोधक आणि गर्भपात
गर्भनिरोधक आणि गर्भपात या दोन विषयांवर प्रशिक्षण देणे फार महत्वाचे आहे. परिस्थितीचा आढावा घेणे, सुरक्षित गर्भपात करणे, वास्तविकता निर्माण करणे आणि देशभरात योग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. सर्व भागातील महिलांना योग्य माहिती उपलब्ध आहे याची खात्री करणे देखील आवश्यक आहे